उदगीर नगर परिषद निवडणूक : प्रभाग 20 मध्ये स्थानिक उमेदवारांना मतदारांचा स्पष्ट कल
 उदगीर प्रतिनिधी
उदगीर नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्व प्रभागां मध्ये उमेदवारांकडून नामांकन फॉर्म भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. प्रभाग क्रमांक 20 मध्ये मात्र मतदारांचा कल स्पष्ट दिसत असून “स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य” अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे.
स्थानिक पातळीवर वाढती लोकसंख्या, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा आणि रस्ते विकास या प्रश्नांवर ठोस काम करणाऱ्या आणि परिसरातील समस्या जवळून जाणणाऱ्या व्यक्तीलाच संधी देण्याचा सुर आढळतो. मतदारांचे म्हणणे आहे की, “आमचा प्रभाग समजणारा, आमच्या लोकांमध्ये वावरणारा आणि आमच्या समस्यांवर काम करणारा व्यक्तीच आमचा प्रतिनिधी व्हावा.”प्रभाग 20 मधील संजय झिपरे राजू भोसले सुजित जिवणे शुभम शिंदे राम भोसले रोहीत कोनाळे राजेश शेटकार इच्छुक उमेदवारांनी आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात केली असून निवडणुकीत चुरस वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. स्थानिक राजकीय वातावरण निवडणुकीच्या दिशेने तापले असून नागरिकांच्या अपेक्षांची परीक्षा या निवडणुकीत होणार आहे.
Popular posts
प्रभाग क्रमांक 9 मधून आदर्श (सोनू) पिंपरे यांची उमेदवारी दाखल
Image
तोगरी पंचायत समितीसाठी अंकुश ताटपल्ले पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
Image
उदगीर नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्र . २० मध्ये भाजप उमेदवारांची चर्चा रंगली
Image
उदगीर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून शिवकुमार झटींगराव कांबळे यांच्या नावाची जोरदार चर्चा
Image