उदगीर प्रतिनिधी
तोगरी पंचायत समिती गटातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार म्हणून अंकुश ताटपल्ले पाटील यांचे नाव जोरदार चर्चेत येत आहे. गेल्या काही वर्षांत सामाजिक क्षेत्रात त्यांनी सातत्याने केलेल्या कामामुळे स्थानिक पातळीवर त्यांची ओळख अधिक मजबूत झाली असून, विविध घटकांकडून त्यांच्या सक्रियतेची दखल घेतली जात आहे.सामाजिक उपक्रम, ग्रामविकास, युवक संघटनांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि स्थानिक समस्यांच्या निराकरणाबाबत घेतलेली पुढाकार यामुळे अनेक मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. तोगरी गटातील काही नागरिकांकडून त्यांच्या नावाला पसंती मिळत असल्याची माहिती समोर येत असून, उमेदवारीबाबत त्यांच्या नावाची चर्चा अधिक बळकटी घेत आहे.
स्थानिक मतदारांचा असा मतप्रवाह दिसत आहे की सामाजिक बांधिलकी आणि युवक नेतृत्व या दोन बाबींमुळे अंकुश ताटपल्ले पाटील हे नाव चर्चेत आहे. त्यांच्या कामामुळे काही मतदार त्यांना पंचायत समितीची उमेदवारी मिळावी असे मत व्यक्त करत आहेत. तोगरी गटातील प्रश्न, पायाभूत सुविधा, युवकांच्या संधी आणि सामाजिक उपक्रमांबाबत ते सक्रिय भूमिका घेत असल्याचे मतदार सांगतात.
मात्र, अधिकृत उमेदवारीबाबत अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा झालेली नसल्याने अंतिम निर्णय येणे बाकी आहे. तरीदेखील स्थानिक राजकीय वर्तुळात आणि जनमानसात अंकुश पाटील यांच्या नावाची चांगलीच चर्चा रंगत असून, निवडणुकीपूर्वी या चर्चेला आणखी वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.