उदगीर तालुक्यातील नगर पालिकेच्या आगामी निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी राजकीय हालचालांना वेग आला आहे. महायुतीमध्ये असलेले भाजप, शिंदे गट व अजित पवार गट यांच्यात उमेदवारीवरून अंतर्गत रस्सीखेच सुरू असून, याचा थेट परिणाम निवडणुकीच्या गणितांवर होताना दिसनार आहे.
महायुती तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रभाव असतानाही, भाजप व शिवसेनेतील (शिंदे गट) कार्यकर्त्यां मध्ये असंतोष निर्माण होत आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक २० मध्ये उमेदवारीच्या संभाव्य निर्णयावर मतदारही नाराजी व्यक्त करत आहेत.
स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार — प्रभाग क्र. २० मध्ये मतदार संभ्रमात
प्रभाग क्र. २० मध्ये सध्या भाजपकडून सुजित जिवणे व राम भोसले हे इच्छुक उमेदवार असून, त्यांचे सामाजिक कार्य व स्थानिक लोकांमधील जवळीक चांगली आहे. त्यामुळे बहुसंख्य मतदार त्यांच्या सोबत असल्याचे चित्र आहे.
"स्थानिक हवे, बाहेरचा नको" — मतदारांचा सूर स्पष्ट
या वॉर्डातील अनेक नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले की, “आम्हाला काम करणारा, आमच्या सुख-दुःखात सहभागी होणारा स्थानिक उमेदवार हवा आहे. बाहेरचा उमेदवार आला, तर त्याला मत नको.” त्यामुळे भाजपकडून सुजित जिवणे व राम भोसले या दोघा पैकी एकाला उमेदवारी मिळावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे.
प्रभाग २० मधील ही स्थिती संपूर्ण महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते. भाजप आणि शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी जर नाराज राहिले, तर त्यांच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळवणे राष्ट्रवादीसाठी कठीण ठरू शकते.
याच पार्श्वभूमीवर, उमेदवारी निश्चित करताना स्थानिक जनतेच्या भावना लक्षात घेणे गरजेचे ठरणार आहे. अन्यथा, महायुतीसाठी ही जागा राखणे आव्हानात्मक ठरू शकते.