तिवटग्याळ ग्रामविकासात सरपंच प्रशांत पाटील यांचे उल्लेखनीय योगदान – ‘आदर्श सरपंच’ पुरस्कारासाठी योग्य दावेदार
 उदगीर प्रतिनिधी
तिवटग्याळ (ता. उदगीर जि. लातूर ) गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच तत्पर असलेले सरपंच प्रशांत पाटील यांनी आपल्या कार्यकाळात गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे तिवटग्याळ ग्रामपंचायतीने अनेक विकासकामांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे.गावातील रस्ते विकास, पाणीपुरवठा सुधारणा, आणि स्वच्छता अभियान या क्षेत्रांमध्ये त्यांनी विशेष पुढाकार घेतला. शासनाच्या विविध योजनांमधून निधी मिळवून गावात पक्के रस्ते, स्वच्छ पिण्याचे पाणी, आणि घनकचरा व्यवस्थापन यांसारखी कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. ग्रामस्थांच्या सहभागातूनगावात स्वच्छता आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रशांत पाटील यांच्या प्रामाणिक कार्यपद्धतीमुळे तिवडग्याळ आज आदर्श ग्रामविकासाचे उदाहरण ठरत आहे. त्यांच्या विकासाभिमुख दृष्टीकोनामुळे आणि जनसंपर्कातून उभारलेल्या लोकविश्वासामुळे ते ‘आदर्श सरपंच’ पुरस्कारासाठी योग्य दावेदार ठरत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे तिवडग्याळ हे स्वच्छ, सुंदर आणि प्रगतिशील गाव म्हणून उदयास आले आहे.

Popular posts
1920 ऐतिहासिक माणगाव परिषद राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Image
प्रभाग क्र . 20 मधून राजू भोसले यांनी काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज मतदारांमध्ये जोरदार चर्चा
उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू — महायुतीमध्ये उमेदवारीवरून नाराजगी सूर
Image
तोगरी पंचायत समितीसाठी अंकुश ताटपल्ले पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
Image
उदगीरात वेश्या व्यवसायवर ग्रामीण पोलिसाची कार्यवाही
Image