उदगीरात वेश्या व्यवसायवर ग्रामीण पोलिसाची कार्यवाही
उदगीर / प्रतिनिधी
उदगीर येथे  काही वर्षा पासून  उदगीर शहर व ग्रामीण भागात वेग वेगळ्या ठिकाणी खूले आम  वेश्या व्यवसाय सुरू आहे शहराती नाईक चौकात आसच देहविक्रीचा व्यवसाय उच्चभ्रु वस्तीत सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळताच त्यांनी तात्काळ मोठी कार्यवाही करीत दोन महिलेसह चार पुरुषांना अटक करण्यात आली आहे .
शहरातील नाईक चौकात पोतदार निवास येथे स्वताःच्या फायदासाठी दोन महिला वेश्या व्यवसाय सुरू  करून महिलांना पैश्याचे अमिष दाखवून महिलांना देह व्यवसायात खेचून हा धंदा मोठ्या प्रमाणात करीत होते. या घटणेची माहिती पोलिसांना मिळताच दि. १५ फेब्रवारी रोजी सांयकाळी ६ वाजण्याच्या सुमारी पोतदार निवास येथे धाड टावून कार्यवाई केली असता. या ठिकाणी रेखा अविनाश मुंडकर रा आनंदनगर, उदयोग भवनच्या मागे उदगीर व मायावती किशोर साळवे रा रमेश पोतदार यांच्या घरी नाईक चौक या दोन महिला वेश्या व्यवसाय सुरू करून इतर दोन महिलांना पैश्याचे अमीष दाखवून कुटनखाना करण्यास भाग पाडत होते. याची माहिती पोलिसांना मिळातच पोतदार यांच्या घरावर धाड टाकून कार्यवाई केली असता. सदर ठिकाणी वरील दोन महिला इतर दोन महिलांना देहविक्री साठी पुरुषांच्या स्वाधीन करून पैसे जमा करीत होत्या. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत व ग्रामीण पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि परशुराम देवकत्ते यांनी कार्यवाही करून कुमटन खाना चालवनाऱ्या रेखा व मायावती यांची चौकशी करूण सदरील ठिकाणी व्यश्या व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या शंकर काशीनाथ कुभारगीरे रा. कमानगर जिल्हा बिदर सूनिल युवराज चादेश्वोरे रा. कमानगर बिदर राजकुमार प्रकाश कुभारगीरे रा. कमानगर जिल्हा बिदर व सोताच्या फायद्या साठी व्यश्या व्यवसाय सुरू होवावे म्हणून स्वताच्या घराचा वापर करणाऱ्या श्रीनिवास रमेश पोतदार याच्या विरोधात कलम 370 / 34 भादवी कलम  3 . 4 . 5 . 7 . अनैतीक व्यापार प्रतिबधक कलमा नुसार गुन्हे दाखल करून वरिल सर्व आरोपीना  ताब्यात घेण्यात आले आहे