उदगीर प्रतिनिधी
उदगीर नगर परिषद निवडणुकीसाठी सर्व पक्षांमध्ये उमेदवार निवडीसाठी चढाओढ सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) कडून प्रभाग क्रमांक ९ मधून शिवकुमार झटिंगराव कांबळे यांनी उमेदवारीची मागणी केली असून, त्यांच्या नावाची मतदारांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
शिवकुमार कांबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि स्थानिक विकासाच्या कामात सक्रिय आहेत. त्यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत प्रशासनापर्यंत त्यांचा आवाज पोहोचवण्याचे काम केले आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये त्यांचा मजबूत जनसंपर्क व लोकाधार निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांकडून “प्रभाग क्रमांक ९ साठी योग्य उमेदवार म्हणजे शिवकुमार कांबळे” असे मत व्यक्त केले जात आहे. पक्षातील इच्छुकांची संख्या वाढत असली तरी, कांबळे यांच्या उमेदवारीला मिळणारा जनसमर्थनाचा उत्साह पाहता त्यांचे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. पक्ष नेतृत्वाकडून अंतिम निर्णय येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.