उदगीर नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्र . २० मध्ये भाजप उमेदवारांची चर्चा रंगली

उदगीर प्रतिनिधी
    उदगीर नगर परिषदेमध्ये सर्वांत्रीक निवडणुकीच्या तयारीला गती मिळाली आहे. प्रभाग क्र.२० मध्ये उमेदवारांनी फॉर्म भरण्यास सुरुवात केली असून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. प्रभाग क्रमांक २० हा भाग भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि मतदार सांगतो की या प्रभागातून भाजपच्या उमेदवारांना मतदारांकडून मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे.यंदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभावी उमेदवार म्हणून सुजित जीवने आणि राम भोसले या दोघांचे नाव चर्चेत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये चर्चा आहे की या दोघांपैकी जोही उमेदवार निवडणुकीत भाजपला तिकीट मिळवतो, त्याला मतदारांकडून बहुसंख्य मत मिळण्याची शक्यता जास्त आहे.बाहेरचा उमेदवार स्वीकारला जाणार नाही असे मत मतदाराकडून केले जात आहे .
राजकीय तज्ज्ञांचे मत आहे की प्रभाग क्रमांक २० मध्ये भाजपची मजबूत पकड कायम आहे, त्यामुळे उमेदवारांची निवड आणि पक्षाची धोरणे महत्त्वाची ठरणार आहेत. यावेळी स्थानिक मतदारांच्या अपेक्षा आणि त्यांच्या मागण्याही महत्वाच्या आहेत.नगरपालिकेतील निवडणूक आयोगाने फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक ती सोय केली आहे. उमेदवार आणि पक्ष कार्यकर्ते आता प्रभागातील मतदारांशी संपर्क साधून त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी सक्रिय झाले आहेत.प्रभाग क्रमांक २० मधील राजकीय रंगभूमी आता उग्र रंग घेतली असून स्थानिक लोकांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. भविष्यात या प्रभागातून कोणता उमेदवार विजयी होतो, यावर नागरिकांची आणि पक्षीय रणनीतीची नजर लागलेली आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रभाग क्र . २० मधील निकाल अनेकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


Popular posts
प्रभाग क्रमांक 9 मधून आदर्श (सोनू) पिंपरे यांची उमेदवारी दाखल
Image
1920 ऐतिहासिक माणगाव परिषद राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Image
उदगीर नगर परिषद निवडणूक : प्रभाग 20 मध्ये स्थानिक उमेदवारांना मतदारांचा स्पष्ट कल
Image
उदगीर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून शिवकुमार झटींगराव कांबळे यांच्या नावाची जोरदार चर्चा
Image
उदगीर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून इलियास महेबूबसाब शेख यांच्या उमेदवारीची चर्चा
Image