निडेबन सर्कलमधून रविंद्र सोमवंशी यांच्या नावाची जोरदार चर्चा
• संपादक - मंगेश संग्राम सुर्यवंशी
उदगीर / प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून निडेबन सर्कलमध्ये स्थानिक उमेदवार म्हणून रविंद्र सोमवंशी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. राजकीय वर्तुळात तसेच सामान्य मतदारांमध्ये रविंद्र सोमवंशी यांच्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.रविंद्र सोमवंशी हे माझी मंत्री संजय बनसोडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. आमदार संजय बनसोडे यांचा विश्वासू कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी पक्षसंघटन व स्थानिक प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. निडेबन सर्कलमधील विविध गावांमध्ये त्यांनी सामाजिक व राजकीय पातळीवर सातत्याने संपर्क ठेवत काम केल्याने त्यांना चांगला जनाधार मिळाल्याचे बोलले जात आहे.स्थानिक नागरिकांमध्ये रविंद्र सोमवंशी यांच्याबाबत विश्वासाचे वातावरण असून “मतदार एकही रुपया खर्च न करता त्यांना निवडून देतील” अशी चर्चा सध्या सर्कलमध्ये ऐकू येत आहे. विशेषतः युवक वर्ग, शेतकरी आणि सामान्य मतदारांमध्ये त्यांची प्रतिमा सहज उपलब्ध, ऐकून घेणारा आणि काम करणारा कार्यकर्ता अशी आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी रविंद्र सोमवंशी यांनी माझी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्याकडे तिकीटाची मागणी केली आहे. पक्षाशी एक निष्ठ राहून दीर्घकाळ काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख असल्याने पक्ष नेतृत्वाकडून त्यांच्या नावाचा गांभीर्याने विचार केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
निडेबन सर्कलमध्ये इतर इच्छुक उमेदवारांचीही नावे चर्चेत असली तरी स्थानिक पातळीवर मिळणारा प्रतिसाद, पक्षातील सक्रियता आणि वरिष्ठ नेतृत्वाशी असलेली जवळीक पाहता रविंद्र सोमवंशी यांचे पारडे जड असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. आगामी काळात पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निडेबन सर्कलमधील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे