उदगीर / प्रतिनिधी
उदगीर पंचायत समिती नळगीर गटातून बालाजी परगे हे इच्छूक म्हणून सध्या चर्चेत आले आहेत. सामाजिक कार्यात सातत्याने सहभाग होणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे आणि जनतेशी थेट संवाद साधणारे कार्यकर्ते म्हणून परगे यांची ओळख निर्माण झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून परगे यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, युवक आणि सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत.
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून जनतेच्या समस्या समजून घेण्याचा आणि त्यावर उपाय शोधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.स्थानिक तरुण वर्ग, सामाजिक संस्था आणि नागरिकांकडून परगे यांच्या इच्छुकतेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे नळगीर गटातील निवडणूक अधिक उत्साहवर्धक आणि रंगतदार होईल, अशी चर्चा स्थानिक वर्तुळात सुरू आहे.