उदगीर जिल्हा परिषदेसाठी लोहारा सर्कल मधून काँग्रेस मधून तिकीटासाठी माजी समाजकल्याण सभापती श्री. मधुकरराव कि .एकुर्केकर यांचे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
श्री . मधुकरराव एकुर्केकर हे गेली अनेक दशके समाजसेवा, ग्रामीण विकास, शैक्षणिक upliftment, तसेच वंचित व दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत आहेत.त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे हाजारो विद्यार्थी आज विविध पदांवर कार्यरत आहेत.त्यांनी ज्या पदांवर काम पाहिलं, तेथे पारदर्शकता, जनतेशी थेट संपर्क, व गरजूंना त्वरित मदत यावर विशेष भर दिला. विशेषतः महिला सक्षमीकरण, बालकल्याण, वृद्ध नागरिकांसाठी आरोग्य सेवा, शेतकऱ्यांच्या अडचणींवर उपाय, अशा विविध सामाजिक उपक्रमांतून त्यांनी लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.
समाजकल्याण सभापती म्हणून काम करताना त्यांनी तालूक्यातील अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधांचा विकास घडवून आणला. पाणीपुरवठा योजना, रस्त्यांचे जाळे, ग्रामीण आरोग्य केंद्रांचा विकास यासाठी त्यांनी प्रभावी भूमिका बजावली.
या पार्श्वभूमीवर लोहारा सर्कलमधील मतदारसंघातील नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.दरम्यान, अमित भैय्या देशमुख व कल्याण पाटील या नेत्यांकडेही लोहारा सर्कलसाठी काँग्रेसकडून तिकीटाची मागणी करण्यात येत असल्याने, पक्षात या सर्कलसाठी इच्छुकांची चुरस पाहायला मिळत आहे.
पक्षश्रेष्ठींचा निर्णय कोणाच्या बाजूने लागतो, याकडे संपूर्ण तालूक्याचे लक्ष लागून राहिले आहे.