उदगीर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून इलियास महेबूबसाब शेख यांच्या उमेदवारीची चर्चा
• संपादक - मंगेश संग्राम सुर्यवंशी
उदगीर प्रतिनिधी
उदगीर नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून इलियास महेबूबसाब शेख यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
इलियास शेख हे स्थानिक पातळीवर सामाजिक कार्यात सक्रिय असून, त्यांचा संपर्क आणि जनाधार लक्षात घेता कार्यकर्त्यांकडून त्यांच्या उमेदवारीची मागणी वाढत आहे. पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांचे राज्याचे मंत्री तथा आमदार श्री. संजय बनसोडे यांच्याशी निकटचे संबंध असून, या मैत्रीमुळे त्यांच्या नावाला अधिक बळ मिळत आहे.
दरम्यान, निवडणुकीचा रंग चढू लागल्याने सर्व पक्षांमध्ये उमेदवारीसाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक ९ मध्ये आगामी निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.