जत्रा की लूटमारीचा आड्डा ? उदगीरच्या आनंद नगरीत मनमानी दराने नागरिकांची आर्थिक लूट
• संपादक - मंगेश संग्राम सुर्यवंशी
उदगीर प्रतिनिधी
उदगीर शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही आनंद नगरी यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या जत्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या जत्रेमध्ये येणाऱ्या नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.आनंद नगरी जत्रेमध्ये लहान मुले, मूलाना बसायचे असेल तर 60 महिला तसेच कुटुंबांसाठी विविध खेळ, 80 रुपय आकाश पाळणा 100 रुपय व मनोरंजनाची साधने उभारण्यात आली आहेत. आनंद नगरी जत्रेमध्ये येणाऱ्या नागरिकांची आर्थिक लूट करत जास्त पैसे आकारले जात असल्याचे जत्रेत येणारे नागरिक बोलत आहे. आकाश पाळणा तसेच इतर खेळांसाठी जिथे अधिकृतपणे मनमानी शुल्क आकारले जाते, तिथे नागरिकांकडून सर्रासपणे बे भाव रक्कम घेतले जात आहेत.विशेष म्हणजे, चालक उद्धटपणे वागणूक देत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक पालकांनी आपल्या मुलांच्या हट्टामुळे जास्त पैसे देण्यास भाग पाडले जात असल्याचे सांगितले. यामुळे जत्रेचे वातावरण बिघडत असून आनंदाच्या ठिकाणी नाराजीचे सूर उमटत आहेत.या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. जत्रेतील खेळांचे दर फलकावर लगाम लावणे, तसेच नियमित तपासणी करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.जर वेळीच कठोर पावले उचलली नाहीत, तर अशा प्रकारांमुळे जत्रेची प्रतिमा मलिन होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.