उदगीर / प्रतिनिधी
महाराष्ट्रात होवु घातलेल्या नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्टार प्रचारकांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये पक्षासाठी सर्वस्व झोकुन देऊन काम करणारे व सामान्य जनतेचे नेते म्हणून ओळख असणारे माजी मंत्री तथा उदगीर - जळकोट मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांची महाराष्ट्राच्या स्टार प्रचारक पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे.
राज्यात सध्या नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून यासाठी त्या - त्या भागात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ध्येय धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करा असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांनी महाराष्ट्रात स्टार प्रचारकांची निवड केली आहे. यामध्ये आमदार संजय बनसोडे यांची निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.