अडीच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सामूहिक वंदे मातरम् गायन शानदार सोहळा संपन्न.

अर्धापूर :- उध्दव सरोदे - 
अर्धापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेंच्या वतीने आयोजित शासकीय कार्यक्रम वंदे मातरम् सामूहिक गायन कार्यक्रमाची सुरूवात भारत माता प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
या प्रसंगी व्यासपीठावर तहसीलदार श्री.रेणुकादास देवणीकर गटविकास अधिकारी श्री.तोडेवाड, गटशिक्षणाधि कारी श्री.लोकदाजी गोडबोले, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता श्री.नीला साहेब,नगराध्यक्षा     
सौ.वैशालीताई प्रवीणजी देशमुख, प्रमुख वक्ते श्री.सनतजी महाजन, मुख्याधिकारी श्री.जगदीश दळवी, उद्योजक श्री.बालाजी कंठेवाड,नायब तहसीलदार श्री.शिंदे,मीनाक्षी देशमुख हायस्कूल संस्थेच्या सचिव सौ.ज्योती ताई देशमुख,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक श्री.शेख सर,औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. कंदलवाड सर यांच्या सह वंदे मातरम गीत समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री.कंदलवाड यांनी केले तर कौशल्य विकास रोजगार व नाविन्यता विभाग मंत्रालय यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात 500 पेक्षा जास्त ठिकाणी वंदे मातरम् सामूहिक गीत गायनाचे कार्यक्रम शासनाच्या वतीने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.वंदे मातरम् हे केवळ गीत नसून ते स्वातंत्र्याचे स्फुलिंग जागृत करणारे व तरुणांच्या हृदयामध्ये देशभक्ती जागृत करणारे महामंत्रच आहे व या मंत्राने लाखो तरुणांना स्वातंत्र्याचे वेड लावले कित्येक जण वंदे मातरम म्हणत फासावर चढले,त्या कठीण काळात स्वातंत्र्यवीरांना वंदे मातरम हे स्फूर्ती व ऊर्जा देणारे गीत होते.बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी या गीताचे लेखन करून भारतीय समाजाला एक वेगळीच दिशा दिली आणि त्यामुळेच आज आपण हे स्वातंत्र्य उपभोगत आहोत परंतु या स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी व देशामध्ये एकसंघ समाज निर्माण करण्यासाठी हे गीत अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन सनतजी महाजन यांनी केले.अध्यक्षीय भाषणात तहसीलदार 
श्री.देवणीकर यांनी शासनाचा हा स्तुत्य उपक्रम असून देशाला दिशा देण्यासाठी व देश एकसंघ राहण्यासाठी वंदे मातरम् फारच आवश्यक असल्याचे प्रतिपादित केले या गीताची प्रत्येक ओळ नागरिकांसा ठी आशेचा किरण असून आपल्या जीवनात प्रगती करण्यासाठी आवश्यक आहे असे ते म्हणाले.या महामंत्रामुळेच आपल्या स्वातंत्र्य सेनानींना लढण्याचे बळ मिळायचे,कारण ते गीत मनोबल वाढवणारे आहे असे ते म्हणाले.
यानंतर प्रा.तानाजी मेटकर यांनी सुरेल आवाजात वंदे मातरम् सामूहिक गायन केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य श्री.कंदलवाड सर यांनी केले.या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन प्रा. तानाजी मेटकर यांनी करून हा कार्यक्रम नियोजनबद्ध रित्या यशस्वी करण्यात आला.
Popular posts
प्रभाग क्रमांक 9 मधून आदर्श (सोनू) पिंपरे यांची उमेदवारी दाखल
Image
उदगीर नगर परिषद निवडणूक : प्रभाग 20 मध्ये स्थानिक उमेदवारांना मतदारांचा स्पष्ट कल
Image
तोगरी पंचायत समितीसाठी अंकुश ताटपल्ले पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
Image
उदगीर नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्र . २० मध्ये भाजप उमेदवारांची चर्चा रंगली
Image
उदगीर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून शिवकुमार झटींगराव कांबळे यांच्या नावाची जोरदार चर्चा
Image