उदगीर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात उमेदवारीसाठी हालचालींना वेग आला असून, प्रभाग क्रमांक ९ मधून आदर्श पिंपरे यांचे नाव प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहे. तरुण, ऊर्जावान आणि जनसंपर्कात पारंगत असलेल्या पिंपरे यांनी गेल्या काही वर्षांपासून सामाजिक आणि विकासात्मक कामांमधून लोकांचा विश्वास जिंकला आहे. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, आणि सामाजीक कार्यात सक्रिय व स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. विविध सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण मोहिमा आणि तरुणांसाठी रोजगार मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून त्यांनी स्थानिकांमध्ये मजबूत जनाधार तयार केला . काँग्रेस पक्षात नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या भूमिकेतून आदर्श पिंपरे यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पिंपरे म्हणाले, “जनतेच्या विश्वासाला उतरून दाखवणे आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय आहे.” सध्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये त्यांच्या नावाची चर्चा जोरात असून, युवक वर्ग तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. काँग्रेसच्या तिकिटावर आदर्श पिंपरे निवडणूक लढवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
प्रभाग क्रमांक ९ मधून आदर्श पिंपरे यांच्या नावाची जोरदार चर्चा
• संपादक - मंगेश संग्राम सुर्यवंशी