प्रभाग क्रमांक 20 मध्ये बाहेरील उमेदवारांविरोधात मतदारांचा सूर; ‘भूमाफिया’ या शब्दाची चर्चा ही वाढली .

उदगीर / प्रतिनिधी
       उदगीर तालुक्यात आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीचा माहौल चांगलाच रंगू लागला असून प्रभाग क्रमांक 20 मध्ये निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार जनसंपर्कात सक्रिय झाले आहेत. मात्र याच प्रभागात मतदारांमध्ये एक वेगळीच चर्चा जोर धरत आहे. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून या प्रभागातून भाजपाचे नगरसेवक निवडून येत असले तरी यावेळी मतदारांच्या अपेक्षा बदलल्या असल्याचे स्पष्टपणे जाणवते. बहुसंख्य मतदार स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देण्याची भूमिका मांडत आहेत. “स्थानिक व्यक्तीला तिकीट दिल्यास आम्ही एक रुपया खर्च न करता त्याला निवडून देऊ. बाहेरून येणारे किंवा पैशावर आधारीत उमेदवार आम्हाला मंजूर नाहीत,” असा स्पष्ट सूर प्रभागातील मतदारांमध्ये उमटत आहे.
याच अनुषंगाने परिसरात आणखी एका मुद्द्याची चर्चा वाढताना दिसत आहे. काही मतदारांमध्ये ‘भूमाफिया’ हा शब्द चर्चेत असून, बाहेरून येणारे काही उमेदवार आर्थिक शक्तीचा वापर करून आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप स्वरूपात उल्लेख केला जात आहे. जरी या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसली, तरी अशा चर्चेमुळे मतदारांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, उमेदवार पायाला बाशिंग बांधून घरोघर भेटी देत असून जनसंपर्कात वेगाने वाढ होत आहे. पुढील काही दिवसांत उमेदवारी अर्जांची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने या प्रभागातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. मतदारांचा बदललेला कल, स्थानिक उमेदवारांकडे वाढती झुकाव आणि ‘भूमाफिया’ या शब्दाभोवती चाललेली चर्चा यामुळे प्रभाग क्रमांक 20 मधील निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे.

Popular posts
1920 ऐतिहासिक माणगाव परिषद राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Image
प्रभाग क्र . 20 मधून राजू भोसले यांनी काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज मतदारांमध्ये जोरदार चर्चा
उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू — महायुतीमध्ये उमेदवारीवरून नाराजगी सूर
Image
तोगरी पंचायत समितीसाठी अंकुश ताटपल्ले पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
Image
तिवटग्याळ ग्रामविकासात सरपंच प्रशांत पाटील यांचे उल्लेखनीय योगदान – ‘आदर्श सरपंच’ पुरस्कारासाठी योग्य दावेदार
Image