उदगीर / प्रतिनिधी
उदगीर नगर पालिका निवडणुकांना वेग आल्यानंतर प्रत्येक प्रभागात राजकीय हालचालींना जोरदार चालना मिळाली आहे. प्रभाग क्रमांक 20 मध्ये विशेषतः रंगत वाढली असून, राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित दादा पवार ) पक्षाकडून बाळासाहेब पाटोदे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांचा अर्ज दाखल केल्यानंतर प्रभागात उत्साह आणि चर्चांना नवे वळण मिळाले आहे.बाळासाहेब पाटोदे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात पुढाकार घेत आले असून, स्थानिक पातळीवर त्यांनी केलेल्या कामांचे कौतुक नागरिक सातत्याने करत आले आहेत. रस्ता, पाणी, मलनिस्सारण, स्वच्छता आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच या प्रभागातील मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला असून, ते मतदारांच्या पसंतीचे उमेदवार म्हणून उदयास येत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही पाटोदे यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त करत त्यांना संधी दिली आहे. पक्षाकडून त्यांना मिळालेल्या पाठिंब्यामुळे त्यांची निवडणूक लढत आणखी मजबूत झाली आहे. उमेदवारी दाखल करताना पाटोदे यांच्या समर्थकांनी प्रचंड उत्साह व्यक्त केला. घोषणाबाजी, गुलालाची उधळण आणि जयघोष यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला.निवडणुकीच्या दिशेने वाढणारी गती आणि प्रभाग क्रमांक 20 मध्ये निर्माण झालेली चुरस पाहता, बाळासाहेब पाटोदे यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात नवा उत्साह निर्माण झाला आहे. मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन देत पाटोदे यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका मांडली आहे. आता बहुचर्चित प्रभाग 20 मधील मतदार खंबीरपणे बाळासाहेब पाटोदे यांच्या पाठीशी राहून त्यांना बहुमतादिक्क्याने विजयी करणार असल्याचे चर्चा ही मतदाराकडून होत आहे .