एकसंघ राहून अतिवृष्टीमुळे आलेल्या संकटावर मात करु : माजी मंत्री आ.संजय बनसोडे


माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते १६ गोधनाचे वाटप


उदगीर : मागच्या दोन - तीन महिन्याच्या काळात आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली व त्यामुळे पशुधनासह शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आम्ही थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जावून केली. ही सर्व परिस्थिती पाहुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हजारो कोटीचे पॅकेज दिले त्याचबरोबर नदीकाठच्या खरडुन गेलेल्या जमीनीची पाहणी करून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. जमीन खरडुन गेलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने साडेतीन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.  माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आपण धीर सोडु नका. जी मदत लागेल ती मदत करण्यास शासन व मी तयार आहे.  अतिवृष्टीमुळे या आलेल्या आस्मानी संकटावर आपण सर्वजण एकसंघ राहून मात करु असे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

ते रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल, श्री. नवयुवक व्यापारी गणेश मंडळ, संघर्ष मित्रमंडळ व नारायणा ॲग्रो प्रा. लि. शेल्हाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने अतिवृष्टीमुळे पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना गोरे व कारवाडीचे 16 गोधन वाटपाचा कार्यक्रम
 उदगीर शहरालगत असलेल्या सोमनाथपुर येथील गोरक्षण संस्था येथे करण्यात आला.
यावेळी बोलत होते.

 यावेळी माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, गोरक्षणचे अध्यक्ष डाॅ.रामप्रसाद लखोटिया, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डाॅ.विजय घोणसीकर, नायब तहसीलदार विलास सोनवणे, महादेव नौबदे, संतोष तोडकर, बालाजी भोसले, रामराव राठोड , सय्यद जानीमियाँ, शशिकांत बनसोडे, प्रशांत मांगुळकर, मोतीलाल डोईजोडे,विक्रम हलकीकर, संतोष फुलारी, विशाल जैन, विदेश पाटील, ज्ञानेश्वर बिरादार, महानंदा सोनटक्के, सरस्वती चौधरी, ज्योती चौधरी, खाजा तांबोळी, राजकुमार पाटील , अनिरुद्ध गुरुडे, भास्कर पाटील, अभिजीत पुदाले, अभय संगेवार,नरसिंग कंदले, दयानंद यल्लावाड, तानाजी वाकुडे, नारायण वाकुडे, संघशक्ती बलांडे, शुभम पाटील, नारायण तळणीकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, 
उदगीरची दुध डेअरी चालू झाली पाहीजे या साठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत या भागात दुध उत्पादनात वाढ होवून शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला पाहीजेत म्हणून आपली दुध डेअरी एनडीडीबीकडे उदगीरच्या डेअरीचे हस्तांतरण लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करत आहोत हा प्रकल्प एनडीडीबीकडे वर्ग होण्यासाठी केंद्र शासन सुध्दा सकारात्मक असुन तीस टक्के राज्य शासन व सत्तर टक्के केंद्र शासनाने आपला वाटा उचलुन ही डेअरी सुरु करण्यासाठी कटीबध्द असुन लवकरच डेअरीचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे या भागातील पशुपालक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असा विश्वासही आ.बनसोडे यांनी व्यक्त केला.

विविध माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. या
आपत्ती काळात मी आमदार म्हणून कायम तुमच्या सोबत आहे. या अतिवृष्टीमुळे मनुष्य व पशुधनाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सामाजिक बांधिलकी जपून सर्व सेवाभावी संस्थांनी काम केले मात्र विरोधकांनी टिका व मोर्चे काढण्यापेक्षा जनतेचे आश्रु पुसण्याचे काम केले पाहिजे असे ही त्यांनी सांगितले.

यावेळी पशुपालक, शेतकरी, विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***********************
Popular posts
1920 ऐतिहासिक माणगाव परिषद राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Image
प्रभाग क्र . 20 मधून राजू भोसले यांनी काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज मतदारांमध्ये जोरदार चर्चा
उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू — महायुतीमध्ये उमेदवारीवरून नाराजगी सूर
Image
तोगरी पंचायत समितीसाठी अंकुश ताटपल्ले पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
Image
तिवटग्याळ ग्रामविकासात सरपंच प्रशांत पाटील यांचे उल्लेखनीय योगदान – ‘आदर्श सरपंच’ पुरस्कारासाठी योग्य दावेदार
Image