जनसेवेचा निर्धार – सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई कांबळे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात
• संपादक - मंगेश संग्राम सुर्यवंशी
उदगीर / प्रतिनिधी
उदगीर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई कांबळे या प्रभाग क्रमांक १७ मधून उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. समाजकार्यातून नागरिकांशी घट्ट नातं निर्माण केलेल्या ताई या गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक उपक्रमांत सक्रिय आहेत. महिला सक्षमीकरण, स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन आणि गरजू घटकांच्या मदतीसाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे.समाजातील सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि स्थानिक विकासासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला आहे. प्रभाग क्रमांक १७ मध्ये मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण यांसारख्या विषयांवर ठोस उपाययोजना राबविण्याचा त्यांचा निर्धार आहे. जनतेच्या आशीर्वादाने व सहकार्याने पारदर्शक, जबाबदार आणि सर्वसमावेशक कारभार घडविण्याचे उद्दिष्ट ताईंनी व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या,“जनतेचा विश्वास आणि सहकार्य हेच माझं बळ आहे. माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबाचा भाग आहे. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता आणि विकासाची नवी दिशा देणं हेच माझं ध्येय आहे. वैशालीताई कांबळे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक १७ मध्ये निवडणुकीची चुरस वाढली असून, त्यांच्या कार्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. समाजकार्यातून निर्माण झालेला विश्वास हा त्यांच्या निवडणूक प्रचाराचा मुख्य आधार ठरणार आहे.