उदगीरात वाळू माफियावर कार्यवाही करणार का प्रशासन ?


वाळू माफिया कडे आधिकारी करतात  दुर्लक्ष.!
जागो जागी थाटले अवैध्य वाळूचे ढिगारे


उदगीर प्रतिनिधी
उदगीर शहर व ग्रामीण भागात  प्रत्येक रस्त्याच्या कडेला वाळूचे ढिगारे पडले
आहेत. जवळपास सर्वच साठे बेकायदेशी असुन देखील हा धंदा तेजीत चालतो आहे. यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
तहसिलदारांची याकडे नजर जात नसल्याचे बोलले जात आहे.उदगीर शहर हे तीन राज्याच्या सीमेवर बसले असुन इथे नेहमीच वर्दळ असते. शिवाय शहराचा विकास झपाट्याने होत असल्यामुळे याठिकाणी जमिनीला प्रचंड भाव येत आहे. त्यांतच शहराची हद्दवाढ झाली असल्यामुळे शहरी विकासा बरोबरच ग्रामीण भागाचाही विकास होत आहे. यात भर म्हणजे वाळू माफियांची वाळू कर्नाटक, नांदेड, परभणी व तेलंगणा भागातुन मोठ्याप्रमात बेकायदेशीर उदगीरात येते. आहे वाळूची तस्करी करणारे प्रशासनातील काहींना चिरीमिरी धनलक्ष्मी देवुन
हा धंदा राजरोसपणे करीत आहेत. रोज शेकडो टिप्पर रेती शहरात येते. काही टिप्परावरी  नबर खोडले आहे तर काही बिना नंबरचे त्याच्यावर कार्यवाहीच होत नाही. अवैध्य वाळू चा हा गोरकधंदा मोठ्याप्रमात सुरु असतो. त्यास प्रशासनाचे अभय असतेच! वाळू माफिया वाळूची तस्करी करण्यासाठी अगोदर वाळुचा साठा मोठ्याप्रमात केला जातो. देगलुर रोड, जळकोट रोड, बिदर रोड, नांदेड रोड व मोंढा-बनशेळकी रोड या भातर रस्त्याच्या कडेला वाळू ढिग टाकून वाळु विक्री खुले आम केली जाते. याकडे महसूल विभागाचे जानिव पुरवक दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुढत असुन पर्यावरणाची प्रचंड हाणी होत आहे. तहसीदारांनी याकडे लक्ष देवुन वाळु साठा करुन विकणारे व ट्रक टिप्पर ने वाळू तस्करी करणाऱ्यांवर कार्यवाह करावी अशी मागणी होत आहे.
Popular posts
प्रभाग क्रमांक 9 मधून आदर्श (सोनू) पिंपरे यांची उमेदवारी दाखल
Image
उदगीर नगर परिषद निवडणूक : प्रभाग 20 मध्ये स्थानिक उमेदवारांना मतदारांचा स्पष्ट कल
Image
तोगरी पंचायत समितीसाठी अंकुश ताटपल्ले पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
Image
1920 ऐतिहासिक माणगाव परिषद राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Image
उदगीर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून शिवकुमार झटींगराव कांबळे यांच्या नावाची जोरदार चर्चा
Image