लातूर, दि. १३ : जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य पदाच्या आरक्षण निश्चितीसाठी आज जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी गणेश पवार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती आरक्षण सोडतीमध्ये निलंगा पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जाती (महिला), औसा पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जाती, उदगीर आणि चाकूर पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), लातूर पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग, जळकोट आणि रेणापूर पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण (महिला), देवणी, अहमदपूर, शिरूर अनंतपाळ पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.
या सोडतीमध्ये जिल्हा परिषद निवडणूक विभागांचे आरक्षण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले-
१) अहमदपूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग-
खंडाळी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
हाडोळती – सर्वसाधारण
शिरुर ताजबंद– अनुसूचित जाती
अंधोरी- सर्वसाधारण
किनगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सावरगाव रोकडा – अनुसूचित जमाती
२) जळकोट तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग-
वांजरवाडा- सर्वसाधारण
माळहिप्परगा- सर्वसाधारण (महिला)
गुत्ती– अनुसूचित जाती (महिला)
३) उदगीर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग-
वाढवणा बु.- नागरिकांचा मागास प्रवर्ग
सोमनाथपूर- अनुसूचित जाती (महिला)
नळगीर - अनुसूचित जाती (महिला)
निडेबन - अनुसूचित जाती
लोहारा - अनुसूचित जाती
हेर- अनुसूचित जाती
तोगरी- सर्वसाधारण
४) देवणी तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग-
बोरोळ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
वलांडी - सर्वसाधारण (महिला)
जवळगा- सर्वसाधारण
५) शिरुर अनंतपाळ तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग-
येरोळ – अनुसूचित जाती (महिला)
साकोळ – अनुसूचित जाती
६) चाकूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग-
जानवळ– नागरिकांचा मागास प्रवर्ग
चापोली- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
रोहिणा - अनुसूचित जाती (महिला)
वडवळ (ना.)- नागरिकांचा मागास प्रवर्ग
नळेगाव- सर्वसाधारण
७) रेणापूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग-
पानगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग
खरोळा – सर्वसाधारण (महिला)
कामखेडा – सर्वसाधारण (महिला)
पोहरेगाव - सर्वसाधारण (महिला)
८) लातूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग -
आर्वी- सर्वसाधारण (महिला)
भातांगळी- नागरिकांचा मागास प्रवर्ग
महाराणा प्रतापनगर- अनुसूचित जाती
पाखरसांगवी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
हरंगुळ बु. – सर्वसाधारण (महिला)
काटगाव – सर्वसाधारण (महिला),
तांदुळजा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
मुरुड बु.- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
निवळी- अनुसूचित जाती (महिला)
एकुर्गा- सर्वसाधारण
९) औसा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग -
लोदगा – सर्वसाधारण (महिला)
आलमला – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
खरोसा – सर्वसाधारण
लामजना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
भादा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
उजनी – सर्वसाधारण
आशिव – सर्वसाधारण (महिला)
मातोळा – सर्वसाधारण (महिला)
किल्लारी – सर्वसाधारण
१०) निलंगा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग -
निटूर – सर्वसाधारण
अंबुलगा बु. – सर्वसाधारण
लांबोटा – सर्वसाधारण (महिला)
दापका – सर्वसाधारण
हलगरा – सर्वसाधारण
औराद (शहा.) – सर्वसाधारण (महिला)
मदनसुरी – सर्वसाधारण (महिला)
सरवडी – सर्वसाधारण (महिला)
कासार शिरसी – सर्वसाधारण,
तांबाळा – अनुसूचित जमाती (महिला)
****