बेसुमार अवैध वाळूसाठे; प्रशासनासोबत अर्थपूर्ण व्यवहार ?
उदगीर/ प्रतिनिधी
उदगीर तालुक्यात मोठ्याप्रमाणात बेकायदेशीर वाळू साठे व विक्री केली जात आहे. महसूल विभाग व पोलिस प्रशासन गर्जे नुसार दिखाऊ कार्यवाई करते. वाळू माफिया खालून व पर्यंत सर्वांन लक्ष्मीदर्शन घडवून अनात असल्यामुळे बेकायदेशीर वाळू विक्रीवर कार्यवाई केली जात नाही. शहर व ग्रामीण भागात तीस ते पस्तीस बेकायदेशीर बाळू साठे आहेत. प्रत्येक वाळवायला दर महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये ठरावीक व्यक्तीकडे गोळा करतो. ही व्यक्ती प्रशासनाला कार्यवाई करुनये यासाठी ठरावीक रक्कम दिली जाते. अशी माहिती वाळू विक्रेतेच सांगत आहेत. आम्ही पैसे देतो म्हणून अमच्यावर कसलीच कार्यवाई होत नसल्याचे उघड बोलतात. इतका मुजोरपणा लाचार व लाचखोर प्रशासनामुळे आला असून शाहनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून योग्यती कार्यवाई करावी.
उदगीर शहर व ग्रामीण भागात बेकायदेशीर वाळूचे साठे मोठ्याप्रमाणात असून याकडे प्रशासन जाणिव पूर्वक दूर्लक्ष करीत आहे. शहरातील देगलूर रोड, जळकोट रोड, निडेबन, बनशेळकी रोड, येनकि- मानकी रोड परिसरात रस्त्यावर व रस्त्याच्याकडेला वाळेसाठे दिसून येतात. शिवाय शहरालगत ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात वाळूसाठे ठेवले आहेत. याकडे महसूल प्रशासन जाणिव पूर्वक दूर्लक्ष करीत असून साठी प्रशासनाला तीन ते चार लाख दिले जाता अशी चर्चा वाळूमाफिया करतात. अधिकारी कर्मचारी पैसे घेतात व आम्हा संरक्षण देतात.
उदगीर शहरात सध्या दररोज दह ते पंधरा वाळूचे टिप्पर येतात काही गाड्यांवर नंबर नाहीत तर काही गाड्या एकाच नंबरच्या आहेत. या गाड्या पोलिस व आरटीओच्या नजरेतून सुटतात तरी कशा तेही ओव्हर लोड, बेकायदेशीर वाहतूक असताना? दुचाकीवर नंबर नसा किंवा दुसर्या राज्यातील गाडी आली की लगेच पकडतात मात्र भला मोठी टप्पर त्यांना कशी काय दिसत नाही. बेकायदेशीर वाळू विक्रीवर बंदी घालून वाळू साठे जप्त करावेत. महसूल विभागाने योग्यती कार्यवाई करून शासनाचा दंड भरुन घ्यावा. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देवू कार्यवाई करणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाचे या वाळू माफियावर मेहेरनजर असल्याचे बोलले जात आहे.