अर्धापूर तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष उध्दव सरोदे व पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार...
अर्धापुर :- उध्दव सरोदे
मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स, भारत सरकार मान्यता प्राप्त माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती आणि पोलीस मित्र फाउंडेशन संचलित माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर यांनी नियुक्त केलेल्या अर्धापूर व लोहा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना अर्धापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात समितीचे मराठवाडा विभागीय संघटक ओमप्रकाश पत्रे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व ओळखपत्राचे वितरण करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या अर्धापूर तालुकाध्यक्षपदी उध्दव सरोदे यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा व पत्रकार संघातील पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.येथील बालाजी मंदिराच्या सभागृहात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हा उपक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उबाठा गटाचे उपतालुकाप्रमुख अशोक डांगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय पाटील इंगोले,गजानन दागंटे,मराठवाडा विभागीय संघटक ओमप्रकाश पत्रेजी व पत्रकार संघाचे अर्धापूर तालुकाध्यक्ष उध्दव सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी गजानन दांगटे यांची लोहा तालुका कार्याध्यक्षपदी तर राजेश्वर देशमुख यांची अर्धापुर तालुका अध्यक्षपदी,संजय पाटील इंगोले मालेगावकर यांची अर्धापुर तालुका उपाध्यक्षपदी,युसुफ अली खान पठाण यांची तालुका संपर्क प्रमुखपदी,सय्यद इस्त्याक अली (फिरदोस) हुसेनी यांची तालुका संघटकपदी,शेख मुस्ताक अली यांची शहर सरचिटणीसपदी आणि मोहम्मद आरिफ पिंजारी यांची तालुका कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.या समितीचे मराठवाडा विभागीय संघटक ओम प्रकाश पत्रे यांनी नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना शाल,पुष्पहार घालून सत्कार करून ओळखपत्र व नियुक्ती पत्राचे वाटप केले.याच कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या अर्धापूर तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार उध्दवराव सरोदे यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा व तालुका कार्यकारिणीचाही सत्कार करण्यात आला.मराठवाडा विभागीय संघटक ओमप्रकाश पत्रे यांनी प्रास्ताविकात समितीची ध्येयधोरणे व कार्याबाबत विस्तृत माहिती दिली.यावेळी अध्यक्षीय समारोपात अशोक डांगे यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.मराठवाडा विभागीय संघटक ओमप्रकाश पत्रे,पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष फिरदोस हुसेनी,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उद्धव सरोदे, तालुकाध्यक्ष राजेश देशमुख,पांचाळ, यांच्या सह आदिंनी मनोगत व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या अर्धापूर तालुका अध्यक्षपदी निवड झालेले जेष्ठ पत्रकार उद्धव सरोदे यांचा व पदाधिकाऱ्यांचा शाल पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी तालुका कार्यकारिणीतील पत्रकार बिभिषण कांबळे,अँड गौरव सरोदे, छायाचित्रकार राजेश पळसकर व सर्व पत्रकार बांधव आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुरेख असे सुत्रसंचलन प्रा तानाजी मेटकर यांनी करून आभार मानले.यावेळी पत्रकार सखाराम क्षिरसागर,पत्रकार गंगाधर सोनटक्केअतुल गोदरे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.