अशोक स्तंभाची उभारणी आणि बौद्ध विहारातील भ्रष्टाचार दोन्ही गोष्टी समाजाच्या अस्मितेच्याच - स्वप्निल अण्णा जाधव

उदगीर प्रतिनिधी 
उदगीर शहराला एक ऐतिहासिक परंपरा आहे. त्यासोबतच या परिसरातील सर्वसामान्य नागरिक देखील संघर्षशिल आहेत, अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठणाऱ्या या क्रांतिकारकांच्या भूमीतून सामाजिक प्रश्नाला हात घालून युवा काँग्रेसचे नेते पिंपरे आणि त्यांचे सहकारी तसेच विश्वशांती बौद्ध विहाराच्या उभारणीमध्ये झालेल्या प्रचंड भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी आणि बौद्ध समाजाच्या अस्मितेचा भाग असलेल्या बौद्ध विहाराची वास्तु अत्यंत निकृष्ट दर्जाची उभारणी केल्यामुळे त्या वास्तूला काळे फासण्याची वेळ यावी, हे दुर्दैव म्हणावे लागेल. आणि या चौकशीसाठी बहुजन विकास अभियान चे नेते संजय कुमार हे आमरण उपोषणाला बसले आहेत. हे दोन्हीही आंदोलन हे सामाजिक प्रश्नाला घेऊन असल्यामुळे शासन आणि प्रशासनाने वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. मात्र दुर्दैवाने शासन, प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी यांच्याकडे फारसा वेळ नसल्याने या आंदोलनाला असेच चिरडून टाकण्याचा प्रयत्न तर केला जात नसेल ना? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. अशी खंत युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी व्यक्त केली आहे. 
          या दोन्ही आंदोलनाला स्वप्निल अण्णा जाधव युवा मंचचा पूर्णपणे पाठिंबा असून या आंदोलनकर्त्याच्या मागण्या रास्त आहेत. समाजाच्या अस्मितेचा प्रश्न घेऊन यांनी लढा उभा केला आहे. त्यामुळे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. अशी आपली ठाम भूमिका आहे, असेही स्वप्निल अण्णा जाधव यांनी जाहीर केले आहे.             
भारतरत्न विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तत्कालीन नेत्यांनी मंजूर केलेला रस्त्याच्या मधोमध बसवण्याचे आश्वासन दिलेला अशोक स्तंभ तात्काळ उभारला जावा. हा समाजाच्या अस्मितेचा विषय घेऊन काही तरुण आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनालाही आपला पाठिंबा आहे. आंदोलनकर्त्यांचा विषय फार महत्त्वाचा आहे. समाजाला दिशा देणारा आहे. त्यामुळेच सर्वांनी त्यांच्या पाठीशी एकसंघपणे उभे राहणे काळाची गरज आहे. असेही विचार युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी व्यक्त केले आहेत.