उदगीर प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील मौजे वाढवणा येथे शासकीय गोडाऊनची उभारणी होत आहे मात्र दुर्दैवाने निकृष्ट काम चालू असल्याचे प्रत्यक्ष पाहणी मध्ये निदर्शनास आले आहे तसेच ग्रामस्थांनी देखील या संदर्भामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. हे सर्व चित्र पाहिल्यानंतर युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी स्वतः गोडाऊनच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे पाहिले सिमेंट बरोबर नाही तसेच विटा देखील अत्यंत कमी दर्जाच्या वापरल्या आहेत चार इंचामध्ये भिंतीचे बांधकाम केले जात आहे ही शोकांतिका आहे शासनाचा पैसा अशा पद्धतीने वाया जात असेल तर वाढवणा येथील ग्रामस्थ कधीही सहन करणार नाहीत अशा बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या अत्यंत संथ गतीने चालू असलेल्या कामाबद्दल संपूर्ण वाढवणा परिसरातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात असल्याची खंत युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी व्यक्त केली आहे. शासनाच्या वतीने यापूर्वी वाढवणा येथे मोठे गोडाऊन बांधलेले होते दगडी बांधकामांमध्ये अत्यंत दर्जेदार असे गोडाऊन तब्बल 100 वर्ष व्यवस्थित टिकून होते मात्र हे नुसते बांधकाम सुरू झाले आहे तर तकलादुपणामुळे बांधकामाची पूर्ण बांधणी होण्यापूर्वीच विटा गळून पडू लागले आहेत तसेच सिमेंट ऐवजी माती आणि चुना वापरला जात असल्याची खंत ही या ठिकाणी प्रत्यक्ष पाणी दरम्यान ग्रामस्थांनी आणि स्वप्निल अण्णा जाधव यांनी व्यक्त केली आहे याप्रसंगी वाढवणा गावचे माजी सरपंच तथा उदगीर पंचायत समिती च्या सभापती चे पती शिवाजी हाळे हे देखील घटनास्थळी उपस्थित राहून कामाचा दर्जा अत्यंत खालावलेला असल्याचे त्यांनी पाहिले आहे त्यांनी देखील या निकृष्ट कामाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. गावातील इतरही उपस्थित स्त्री-पुरुषांनी तीव्र शब्दात अशा बोगस आणि बनावट कामाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. शासनाचा पैसा म्हणजे जनतेच्या विविध टॅक्स मधून जमा झालेला पैसा आहे याचाच अर्थ अप्रत्यक्षपणे जनतेच्या पैशाचा असा गैरवापर होत असेल तर जनतेने ते सहन करू नये, संबंधित अधिकाऱ्याला समोर बोलावून प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्यास सांगावे तसेच दर्जेदार काम करून घ्यावे असेही आवाहन स्वप्निल अण्णा जाधव यांनी केले आहे.