उदगीर/ प्रतिनिधी
सन- उत्सव आले की भक्तांच्या भावनेशी खेळण्याचा व लुटण्याचा धंदा मोठ्याप्रमाणात होतो. नवरात्र निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली शहरामध्ये दुध डेअरी, दुधिया हनुमान मंदिर शेजारी याठिकाणी दि. २८ ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान राधासाई दांडीया महोत्सव व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेच्या नावाखाली लुटीचा धंदा संयोजक बाळासाहेब पाटोदे व अभिजित औटे यांनी सुरू केला असल्याची चर्चा होत आहे.
भारत हा विविधतेने नटलेला व देश आहे. धार्मिक देश म्हणून ओळखला जातो. याचा फायदा घेत अनेकजण जनतेच्या भावनेशी खेळत बाजार मडतात असा प्रकार उदगीर मध्ये गेल्या अनेक वर्षापासून केला जात आहे. दांडिया महोत्सवाच्या नावा खाली अनेकांना आपल्या स्पर्धेच्या मोहजाळात अडकवितात. यालाच लुटीचा जोड धंदा म्हणजे दांडिया, आकर्षक ट्रस, जिती, चप्पल, दागिने, टिकली व मेकअप असा धंदाही जोमात चालतो.
दांडीया स्पर्धेचे हे १३ वे वर्ष असून या स्पर्धा फक्त युवती व महिलांसाठी आयोजीत करण्यात आले आहे. तिकीट दर प्रत्येक स्पर्धकासाठी १५० रु. ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये फॅन्सी ड्रेस, युवती गट, महिला गट, महिला ग्रुप व बालगट असे विभाग असणार आहेत. या दांडीयासाठी दि. २५ ते २७ सप्टेंबर पर्यंत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या स्पर्धा दि. २८, २९ व ३० सप्टेंबर रोजी सायं. ५ ते १० यावेळेत होणार आहेत. या स्पर्धेमध्ये महिला गटास (२५ ते ४० वयोगट) प्रथम पारितोषिक रु. ५०००, द्वितीय रु. ३००० व तृतीय रु. १५००, महिला गट (४० वर्षांपुढील) प्रथम पारितोषिक रु. ५०००, द्वितीय रु. ३००० व तृतीय रु. १५००, महिला वैयक्तिक (२५ ते ४० वयोगट) पारितोषिक प्रथम रु. १५००, द्वितीय रु. १००० तृतीय रु. ७५०, महिला वैयक्तिक ( ४० वर्षांपुढील) पारितोषिक प्रथम रु. १५००, द्वितीय रु. १००० व तृतीय रु. ७५०, युवती गट (१२ वर्षांपुढील) पारितोषिक प्रथम रु. ५०००, द्वितीय रु. ३००० व तृतीय रु. १५००, युवती वैयक्तिक (१२ वर्षांपुढील) पारितोषिक प्रथम रु. १०००, द्वितीय रु. ७५० व तृतीय रु. ५००, बालगट (वय ६ ते १२) पारितोषिक : प्रथम रु. १०००, व्दितीय रु.७५० व तृतीय रु.५०० तसेच फँसी ड्रेस (सिंगल) प्रथम, द्वितीय व तृतीय भेटवस्तू देण्यात येणार आहेत. तसेच उत्तेजनार्थ १०१ आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सुंदरी साडी तर्फे २५ पैठणी साड्या, गुजराती भाभी साडी सेंटरच्या वतीने ११ घागरा व धुर्वे भांडी यांच्याकडून ५० टिफीन बॉक्स असे गिफ्ट ठेवण्यात आले आहेत. अशी लुभावने देवून आयोजक लुटत असल्याचे बोलले जात आहेत.