भंते निवास व बुध्द विहार परिसर सुशोभिकरणाचे काम गुणवत्तापुर्ण करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सुचना
उदगीर : येथील समाज बांधवांच्या मागणीचा विचार करून आपण विश्वशांती बुद्ध विहाराची निर्मिती केली.
गुलबर्गा येथील बुद्ध विहाराप्रमाणे उदगीर शहरातील तळवेस येथे भव्य बुध्द विहार उभारुन या विहाराचे लोकार्पण महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केले. आपल्या समाजामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आचार, विचार आपल्या पुढच्या पिढीमध्ये रुजावे म्हणून या विहाराची निर्मिती केली असून आपल्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला हे विहार प्रेरणा देईल. भविष्यात विश्वशांती हे बुद्ध विहार
एक संस्कार केंद्र म्हणून ओळखले जावे असा विश्वास माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.
प्रारंभी आ.संजय बनसोडे यांनी तथागत भगवान बुध्द आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शहरातील विश्वशांती बुद्ध विहार व विहाराच्या परिसराची माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी पाहणी करून विहाराच्या परिसरात पूज्य भंते यांचे निवासस्थान नव्याने उभारण्यात येणार असून यासह परिसरातील अशोकस्तंभ, पथदिवे, लाॅन, पाण्याची व्यवस्था व इतर सुशोभीकरण आदींची पाहणी करून नव्याने मंजूर करण्यात आलेली कामे त्वरित व गुणवत्तापुर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या.
यावेळी भंते नागसेन बोधी, नांदेडचे भंते सुभूती, भिक्खुणी शासन जीना, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी नगराध्यक्ष सौ.उषा कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अलका डाके, बांधकाम विभागाचे सुनिल नरहरे, तहसीलदार राम बोरगावकर,
मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी, पाणीपुरवठा विभागाचे सुनिल कटके, दिपक महालिंगे, प्रा. श्याम डावळे, तालुका कार्याध्यक्ष वसंत पाटील, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, भाजपा शहराध्यक्ष अमोल अनकल्ले, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, जळकोटचे संग्राम हासुळे पाटील, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, राजकुमार भालेराव, विजय निटुरे, श्रीरंग कांबळे, ज्ञानेश्वर बिरादार, बाळासाहेब पाटोदे, दिलीप सोनकांबळे, मधुमती कनशेट्टे, वैशाली कांबळे, अभिजित औटे, प्रदीप जोंधळे, शफी हाशमी, वाहेद खुरेशी, विलास शिंदे, विद्यासागर डोरनाळीकर, श्री पाटील, मदन तुळजापुरे, जवाहरलाल कांबळे, अविनाश गायकवाड, सतिश कांबळे, शिवा पकोळे, प्रेम गायकवाड, अविनाश कांबळे, महेश आंदे, आदी उपस्थित होते