पोतणे परिवाराचे स्वप्निल अण्णा जाधव यांच्याकडून सांत्वन

उदगीर (प्रतिनिधी) उदगीर विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीच्या दरम्यान बालाजी रावसाहेब पोतणे हे 45 वर्षे वयाचे तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे, त्यांचा मृत्यू झाला होता. घरातला कर्ता पुरुष अचानक निघून गेल्याने त्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्या कुटुंबाला आधार देण्याच्या दृष्टीने तथा सांत्वन करण्यासाठी युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी आपल्या हितचिंतकासह बालाजी रावसाहेब पोतने परिवाराची भेट घेऊन धीर दिला. तसेच आपल्या परीने त्या परिवाराला अर्थसहाय्य केले. याप्रसंगी वाढवांना येथील माजी सरपंच शिवकुमार हाळे, माजी सरपंच उत्तम दादा गायकवाड आणि स्वप्निल अण्णा जाधव युवा मंचचे पदाधिकारी यांनी ढोरसांगवी येथे जाऊन पोतणे परिवाराला धीर दिला.
 आपल्या वडिलांनी दिलेली शिकवण सार्थकी करत आपल्या घामाच्या पैशातून उरलेल्या चार पैशाला समाजकार्यासाठी खर्च करावे. या विचाराने सामाजिक बांधिलकी जपत स्वप्नील अण्णा जाधव यांनी कार्य चालू ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ढोर सांगवी येथील पोतने परिवाराला मदत करण्याच्या उद्देशाने तथा मानसिक धीर देण्याच्या उद्देशाने युवा मंचचे पदाधिकारी आणि मित्र मंडळांनी भेट देऊन अर्थसहाय्य केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Popular posts
1920 ऐतिहासिक माणगाव परिषद राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Image
राधासाई दांडीया महोत्सवाच्या नवाखाली भावनिक लूट
Image
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांची लेखी निवेदनाव्दारे मागणी
Image
माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती व ओळखपत्राचे वाटप ;
Image
पोट खराब नोंदीला स्थगिती द्या, ई पीक पाणी रद्द करा - स्वप्निल अण्णा जाधव
Image