देवणी प्रतिनिधी : भारतीय रिझर्व बँक यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिसिल फाउंडेशन मुंबई च्या सहकार्याने मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटर देशा मध्ये व देशा बाहेर सेंटर स्थापन केलेले आसुन देवणी सेंटर येथे फस्ट फेस फस्ट एक्सटेंशन सि एफ एल इनोग्रेशनचे उध्दघाटन प्रमोद शिंदे LDM यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे SBI शाखेचे मॅनेजर धनंजय इंगोले, महाराष्ट्र ग्रामीण बँकचे मॅनेजर राजू घुले,उमेदचे राजेंद्र विडप,मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटरचे सेंटर मॅनेजर हुसेन धोत्रे,मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटरचे डि ई ओ लक्ष्मीकांत मोरे,मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटरचे फिल्ड कॉर्डिनेटर जयश्री सोनकांबळे.इत्यदी उपस्थित होते. फस्ट फेस फस्ट एक्सटेंशन सि एफ एल इनोग्रेशन उध्दघाटन प्रसंगी प्रमोद शिंदे LDM बोलत असताना म्हणाले की,बँकेचा जे काही सेवा योजना आहेत तळागाळातील जनतेपर्यंत सेवा पुरवण्याचे काम मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटरच्या माध्यमातून होत असले तरी सर्व बँकर्सनी /शाखा व्यवस्थापक,बि.सी/सी एस पी यांनी सि एफ एल ला लिंकेज कॅम्प साठी मदत करणे गरजेचे आहे जेणेकरून लिंकेज वाढते व जनतेना बँकेच्या सेवा योजना घेण्यास सोपे होणार आहे असे सांगीतले.प्रस्ताविक सि एफ एलचे एरिया मॅनेंजर आरविंद वाडेकर यांनी मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटरच्या माध्यमातून केलेल्या कामाचा आढावा सांगून पुढील कामाचे नियोजन व काम कसे करायचे सांगीतले. कार्यक्रमाला उपस्थित देवणी तालुक्यातील नागरीक व रूरल फायनेंशियल अडवाईझर विजयकुमार सुर्यंवशी,मारोती सुर्यंवशी,मारोती रणदिवे,महेश सोनकांबळे,मुकेश मसुरे, प्रतिक मसुरे ,मिनाबाई सुर्यंवशी,अनुसया दामा,राधा खोंडे,सुनिता तगरे,द्वावारका जाधव बबन धोत्रे इत्यादी उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हुसेन धोत्रे यानी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्मीकांत मोरे यांनी मांडले
वंचित लोकांपर्यंत बँकेचा सेवा पोहचल्या पाहीजेत प्रमोद शिंदे LDM