उदगीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या इच्छुकांना मिळेल का न्याय का पक्ष बदलणारे घालतील पायात पाय....!

उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन गेल्या अनेक वर्षापासून अनुसूचित जाती जमातीतील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष नेतृत्वाकडे ही जागा काँग्रेसला सोडून घ्यावी व निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यावी अशी मागणी पक्षसृष्टीकडे केली आहे ही मागणी कार्यकर्त्याच्या दृष्टीने अत्यंत योग्य असून काँग्रेस नेतृत्व या मागणीचा विचार करतील का की अशाच प्रकारे अनुसूचित जाती जमातीच्या कार्यकर्त्यांना फक्त पक्षाचा जयजयकार व नेत्याचा उदो उदो करून आयुष्य घालणार की काय असा प्रश्न पडला आहे. लातूर लोकसभा निवडणुकीत अनुसूचित जाती जमाती च्या जागेवर काँग्रेस पक्षाने डॉक्टरांना उमेदवारी देऊन निवडून आणले पण उदगीर राखीव मतदारसंघात आज पर्यंत ही जागा कुण्या पक्षाला सुटेल व उमेदवार कोण असेल हे समजत नाही. काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असणारे उमेदवार हे सुशिक्षित आहेत. शांत संयमी व लोकाभिमुख असे इच्छुक उमेदवार आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते काँग्रेस पक्षात कार्य करीत आहेत पण पक्षाकडे पक्ष बदलून येणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली दिसते ्यामुळे या बिचार्‍या काँग्रेस निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळेल की नाही असा प्रश्न पडला आहे. लातूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला संधी मिळणार असे चर्चिले जात आहे पण नेमकी ती मतदारसंघ उमेदवार कोण हे आज पर्यंत कळले नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जर उदगीर मतदार संघात काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारावर अन्याय झाला तर पक्ष बदललेल्या लोकांना मतदार धडा शिकवतील असे सर्वत्र चर्चिले जात आहे.