उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये विकासाची गंगा उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघात आणून एक आपलं आगळं वेगळं कर्तृत्व दाखवणारे मतदारसंघातल्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातले आमच्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ नामदार संजय भाऊ बनसोडे यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भरभरून मतदान करून आपल्या लाडक्या भावाला दीपावलीची भेट म्हणून लाडक्या बहिणीने भरभरून मतदान करावं व आपल्या मतदारसंघाचा एक आगळावेगळा इतिहास लाडक्या बहिणीने दाखवून द्यावा असे आवाहन सौ ज्योती पांडुरंग कलंबरकर यांनी केले आहे.
पुढे बोलताना सौ कलंबरकर म्हणाल्या आज पर्यंत उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघात अनेक आमदार होऊन गेले त्या त्यावेळी त्यांनी जमल मतदारसंघात काम केलं. पण या पाच वर्षांमध्ये संजय भाऊ बनसोडे यांनी आमदार मंत्री कसा असावा हे आपल्या कार्यातून दाखवून दिले. उदगीर सारख्या डोंगराळ भागात विकासाची गंगा आणून महामहीम राष्ट्रपतीला मतदारसंघात आमंत्रित करून एका महिला राष्ट्रपतीचे विचार आम्हा महिलांना ऐकवले. एक सामान्य कार्यकर्ता आपल्या कार्यातून उदगीर चे नाव देशाच्या नकाशावर नेऊन पोहचवले अशा कर्तुत्वान आमदाराची मतदारसंघाला गरज असून उदगीरला शासनाच्या विविध योजना व उदगीर जिल्हा करण्यासाठी संजय भाऊ सारखे नेतृत्वाची गरज आहे. पाच वर्षांमध्ये या नेतृत्वाने कधीही आपल्या लेकरा बाळाचा संसाराचा विचार केला नाही. आज उदगीरात तर उद्या विधानभवनात दिसणारे वेगवेगळे शासनाचे निर्णय खेचून आणणारे. जे जे नव ते उदगीरला हवं असा दृष्टिकोन डोळा समोर ठेवून विकास करणाऱ्या या विकास पुरुषाला निवडून आणणे हे मतदारसंघासाठी गरज असून सर्व मतदारांनी आपल्या सगळ्यांना प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीवरून आपल्या लाडक्या भावाचा विजय हा अधिकाधिक मतांनी कसा होईल याचाच प्रयत्न करावा व या विकास कार्यात आपला सहभाग नोंदवावा अशी आवाहन शेवटी सौ कलंबरकर यांनी केले आहे.