एकता नवरात्र उत्सव समितीच्या मंडळास सौ.शिल्पाताई संजय बनसोडे यांची भेट
उदगीर / प्रतिनिधी
उदगीर येथे संत रविदास नगर व आनंद नगर परिसरात गेली २५ वर्षांपासून देवीची घटस्थापना करण्यात येत आसून घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय युवक कल्याण बंदरे मंत्री तथा आपल्या मतदार संघाचे.मा.ना.श्री.संजय भाऊ बनसोडे यांच्या पत्नी सौ.शिल्पाताई संजयजी बनसोडे यांच्या शुभ हस्ते देवीच्या मुख्य मुर्ती चे पुजन करण्यात आले.
यावेळी मंडळाच्या वतीने सौ.गीता गणेश गायकवाड यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.