अपक्ष उमेदवार स्वप्नील जाधव यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला
उदगीर विधानसभा मतदार संघासाठी आपली उमेदवारी कायम राहणार असल्याचे सांगत अपक्ष उमेदवार स्वप्नील (अण्णा) अनिल जाधव यांनी आपल्या असंख्य समर्थकासह मिरवणुकीने येत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उदगीर विधानसभा मतदारसंघात आज पर्यंत सहा उमेदवारांनी सात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उदगीर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची समजली जात आहे या मतदारसंघातून महायुतीकडून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे हे आहेत तर महाविकास आघाडी कडून माजी आमदार सुधाकर भालेराव हे राहतील यासोबतच भाजप ने आपल्याला उमेदवारी दिली नाही म्हणून अपक्ष उमेदवारी लढवण्याची तयारी ठेवणारे विश्वजीत अनिल कुमार गायकवाड हे देखील या निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार आहेत याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी यांचेही उमेदवार राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे असे असले तरीही आपण इतरांपेक्षा सरस ठरू असा विश्वास दाखवत अपक्ष उमेदवार स्वप्नील जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यासाठी त्यांनी आपले मूळ गाव वाढवणा परिसरातील व जळकोट तालुक्यातील असंख्य समर्थकासह उदगीर येथे येऊन महापुरुषाला अभिवादन करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Popular posts
1920 ऐतिहासिक माणगाव परिषद राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Image
प्रभाग क्र . 20 मधून राजू भोसले यांनी काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज मतदारांमध्ये जोरदार चर्चा
उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू — महायुतीमध्ये उमेदवारीवरून नाराजगी सूर
Image
तोगरी पंचायत समितीसाठी अंकुश ताटपल्ले पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
Image
तिवटग्याळ ग्रामविकासात सरपंच प्रशांत पाटील यांचे उल्लेखनीय योगदान – ‘आदर्श सरपंच’ पुरस्कारासाठी योग्य दावेदार
Image