उदगीर : होवु घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांची उमेदवारी जाहिर केली असुन त्यांच्या विजयासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने सज्ज झाले असल्याची माहिती लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिली.
येथील माजी आ.गोविंदराव केंद्रे यांच्या निवासस्थानी ना.संजय बनसोडे यांच्या प्रचारार्थ भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.
या बैठकीला राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, विनायकराव बेंबडे, भगवानराव पाटील तळेगावकर, रामचंद्र तिरुके, बसवराज पाटील कौळखेडकर, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, बापुराव राठोड, पंडित सुर्यवंशी, हणमंत हंडरगुळे, शिवशंकर धुप्पे, मनोज पुदाले, सुधीर भोसले, अॅड.दत्ता पाटील, बस्वराज रोडगे, साईनाथ चिमेगावे, अमोल निडवदे, बालाजी गवारे, संजय पाटील, विजय पाटील, संगम आष्टुरे, सुदर्शन माने, धर्मपाल नादरगे, रमेश शेरीकर, प्रदीप जाधव, रामराव बिरादार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राहुल केंद्रे म्हणाले की,
सामान्य जनता ठाकरे सरकारवर नाराज झाली होती. त्यासोबतच ठाकरे सरकार मधील अनेक मंत्री नाराज झाल्याने त्यांनी भाजपासोबत येऊन सरकार स्थापण केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या सरकारने सामान्य जनतेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले. नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनीही महायुतीच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारला आणखी बळ मिळाले. या अडीच वर्षाच्या काळात भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाच्या सरकारने राज्यातील सामान्य जनतेच्या हितासाठी झपाटून काम केले. विविध योजना सर्वसामान्यांच्या दारी पोहचवल्या. महिलांना स्वबळावर उभे राहावे यासाठी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली. शेतकऱ्यांसाठी अनेक क्रांतिकारी योजनांचे निर्णय घेतले. त्यामुळे सामान्य जनतेच्या मनात महायुतीच्या सरकारबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार संजय बनसोडे यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात उदगीर मतदार संघात कोट्यावधी रुपयाचा विकास निधी खेचुन आणून उदगीरचा कायापालट केला. केवळ विकास कामे करून ते थांबले नाहीत तर सामान्य जनतेशी ते कायम संपर्क ठेवून जनतेतला मंत्री म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. आज विरोधक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु उदगीरच्या विकासासाठी पुन्हा एकदा संजय बनसोडे निवडून येणे ही काळाची गरज आहे. महायुतीने ना. संजय बनसोडे यांची उमेदवारी आज जाहीर केली असून आगामी काळात त्यांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वजण एक दिलाने काम करू असा विश्वासही यावेळी राहुल केंद्रे यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.