महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत राखीव जागेवर मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. या राखीव मतदारसंघात जो आपल्या विचाराचा आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन केले आहे. या निर्णयामुळे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते संजय भाऊ बनसोडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. आजपर्यंत संजय भाऊ बनसोडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो की समाजाची कुठलीही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करण्याची भूमिका आजपर्यंत राहिली आहे. त्यांनी केलेल्या समाजासाठी कार्याचा आलेख डोळ्यासमोर दिसत आहे. त्यामुळे उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघात ला मराठा बांधव काही वेगळी भूमिका घेईल असे मला वाटत नाही. समाजाची जी काही अडचण आहे व काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी संजय भाऊ बनसोडे हेच खंबीर नेतृत्व सर्वांना दिसत आहे. संजय भाऊ बनसोडे यांच्या पाठीमागे तळागाळातील जनता तर आहेच. सर्व जाती-धर्मातील लोकांना गेल्या पाच वर्षात न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यामुळे संजय भाऊ बनसोडे यांचा विजय कोणीच रोखू शकणार नाही. ते सर्वाधिक मतांनी निवडून येतील. विकास कामे केल्यानंतर मतदार त्यांना विजयाची पावती देणारच आहे हे मात्र निश्चित.
मनोज दादा जरांगे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे संजय बनसोडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा. - बाळासाहेब पाटोदे