मनोज दादा जरांगे चा आशीर्वाद मला प्रेरणा देणारा - स्वप्निल जाधव
उदगीर (प्रतिनिधी)
विधानसभा मतदारसंघांमध्ये जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने भूमिका घेऊन विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले अपक्ष उमेदवार स्वप्नील जाधव यांनी मराठा आरक्षणाचा योद्धा म्हणून महाराष्ट्रात गाजत असलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तब्बल दोन तास त्यांच्या सोबत चर्चा झाली. येणाऱ्या 20 तारखेला मनोज जरांगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, मात्र भूमिका काही जरी ठरली तरी स्वप्निल जाधव यांच्या पाठीवर माझा आशीर्वाद राहील, अशा पद्धतीचा प्रेरणा देणारा संदेश त्यांच्याकडून मिळाल्यामुळे मला विधानसभा निवडणुकीची ही लढाई खूप सोपी जाईल, असा विश्वास आहे. असे विचार स्वप्नील जाधव यांनी व्यक्त केले आहेत.
महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांची बैठक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे बोलावली होती. त्या बैठकीमध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघातून आपण इच्छुक असून मराठा आरक्षणाला आपला पूर्णपणे पाठिंबा असल्याचे निवेदन स्वप्नील जाधव यांनी दिल्यानंतर स्वतंत्र उमेदवार टाकून निवडणूक लढवायची की मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडायचे ही भूमिका ठरणार आहे मात्र भूमिका काही जरी ठरली तरी आपण तुमच्या सोबत राहू असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी दाखवल्यामुळे आपल्याला विजयाची खात्री निर्माण झाली आहे अशी विचार प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्वप्निल जाधव यांनी व्यक्त केले आहेत.
आतापर्यंत गोरगरिबांच्या प्रश्नावर आपण लढा दिला आहे मग भूमीहिन गोरगरीब जनतेच्या घरकुलाचा प्रश्न असेल गायरान जमिनीवर वसाहती करून राहिलेल्या जनतेला कबाले देण्याचा विषय असेल नाहीतर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी वाढवलेली महागाई आणि विद्यार्थी व्यापारी न्यायालयीन प्रक्रियेत लागणारे 50 रुपये 100 रुपयांचे बॉण्ड सरकारने रद्द करून चक्क पाचशे रुपयांचे फोन केले आहेत हे गोरगरिबांना अन्यायकारक आहे म्हणून लढा उभारण्याची तयारी असेल, उदगीरच्या शासकीय दूध योजना आणि दूध भुकटी प्रकल्प पुनरुज्जीवनासाठी आंदोलनाचा विषय असेल आपण सदैव उदगीरच्या अस्मिते सोबत राहू असा विश्वास दाखवल्यामुळे उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वप्निल जाधव यांचे नाव आता प्रत्येक घराघरापर्यंत आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले आहे एक निस्वार्थ भावनेने केवळ लोककल्याणाच्या हिताचा विचार घेऊन मैदानात उतरलेला हा तरुण आता लोकांना आवडू लागला आहे. अशा लोकप्रिय उमेदवाराची माहिती घेऊन मराठा योद्धा मनोज जरांजे पाटील यांनी स्वप्निल जाधव यांना आशीर्वाद दिला की काय अशीही चर्चा आता मतदारसंघात रंगू लागली आहे यामुळे आघाडीच्या लढतीत स्वप्निल जाधव अग्रेसर ठरतील अशा पद्धतीचे भाकीत लोक व्यक्त करू लागले आहेत.