भुमीगत गटारामुळे उदगीर शहर स्वच्छ व सुंदर शहर होण्यास मदत : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे
उदगीर शहरातील रोगराई नष्ट होणार
उदगीर :  मतदार संघाचा मास्टर प्लाॅन तयार करुन गेल्या ५ वर्षात नागरिकांना मुलभुत गरजा पुरविल्या असुन मतदार संघाचा चौफेर विकास करुन महाराष्ट्रात उदगीरचा एक विकासाचा 'नवा पॅटर्न' निर्माण केला असुन शहरातील सर्व इमारती अद्यावत सुविधेसह पुर्णत्वाकडे जात आहेत. रस्ते, वीज, पाणी, आरोग्याच्या सुविधा, सर्व समाज घटकांना न्याय दिला. नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण होवु नये व उदगीर शहर स्वच्छ व सुंदर दिसावे आणि शहरातील सर्व नालीचे पाणी शहराच्या बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागातुन नगरोत्थान महाभियानांतर्गंत उदगीर शहरातील (भुमीगत गटार) मलनि:स्सारण प्रकल्पास ३६० कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असुन पहिल्या टप्प्यात एकुण १६१ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्या पहिल्या टप्प्यातील वरकींग सर्व्हेच्या कामाला आज सुरुवात झाली असून या भुमिगत गटारामुळे उदगीर शहर स्वच्छ व सुंदर शहर होण्यास मदत होणार असल्याचे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर शहरातील भुयारी गटार योजने अंतर्गंत सर्व्हेच्या (टप्पा - १) कामाच्या भुमिपुजन सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
यावेळी मुख्याधिकारी सुंदर बोंदर, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, सय्यद जानीमियाँ, बाळासाहेब पाटोदे, जितेंद्र शिंदे,
जयंती सुपर कन्ट्रक्शन कंपनीचे मेहसाना गुजरात, प्रोजेक्ट इंन्चार्ज जस्मिन गोयाणी, प्रकल्प व्यावस्थापण सल्लागार सतिश राठोड, ऋषीकेश बंडगर, राऊत, पाणी पुरवठा अभियंता एस.एस. कटके, अविनाश गायकवाड, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान कार्यक्रमांतर्गत उदगीर शहर भुयारी गटार योजना टप्पा - १ या योजनेच्या कामाला सुरुवात झाली असून उदगीर शहरातील नालीचे पाणी शहराच्या बाहेर काढण्यात येणार असून आता या भुमीगत गटारामुळे उदगीर शहरातील रोगराई कमी होवून आपण निरोगी आयुष्य जगणार आहात. शहरातील नागरीकांना मूलभूत गरजा पुरवुन आरोग्य, रस्ते, वीज, पाणी आदी सुविधा पुरविला असल्याचे ना.संजय बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी उदगीर शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.