युवा उद्योजक बाळासाहेब पाटोदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश
उदगीर : येथील युवा उद्योजक बाळासाहेब शंकरराव पाटोदे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. यावेळी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री ना. संजय बनसोडे, शिक्षक आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बालाजी भोसले
दावणगाव सोसायटीचे व्हाईस चेअरमन धनाजी मुळे आदीसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब पाटोदे यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ना.संजय बनसोडे यांनी दिवस-रात्र प्रयत्न करत असुन त्यांच्या खांद्याला खांदा लावून या विकास कार्यात सहभागी होण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले. मी ठेकेदारी करण्यासाठी किंवा आर्थिक लाभ घेण्यासाठी प्रवेश केला नसून ना. संजय बनसोडे यांचेसारखे नेते मतदार संघाचे विकासासाठी रात्रंदिवस धडपडत आहेत अनेक प्रलंबित असलेले विकासाचे प्रश्न पूर्ण करण्यासाठी ना. बनसोडे यांनाच आपण साथ दिली पाहिजे यासाठी मी प्रवेश करीत असल्याचे सांगितले.
 यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मी तुमच्या पाठीशी आहे. मतदारसंघातील ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करा. ना.संजय बनसोडे यांना साथ द्या असे म्हणून आशिर्वादाची थाप मारली. शासकीय विश्रामगृह उदगीर येथील या प्रवेश सोहळ्यावेळी अनेक मान्यवर कार्यकर्ते व नेते उपस्थित होते.