उदगीर प्रतिनिधी
उदगीर जळकोट मतदार संघातून सुधाकर शृंगारे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्या करीत
दररोज ठरावीक गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांशी संपर्क करीत आहेत. दि . २२ सप्टेंबर रोजी वांजरवाडा जिल्हा परिषद गटात मतदार सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. उदगीर जळकोट विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची त्यांची तयारी दिसून येत
आहे. २०१९ ते २४ पर्यंत खासदार असताना लातूर जिल्ह्यांच्या विकासासाठी तब्बल १६००० कोटी रुपये इतका मोठा निधी केंद्रातून लातूर जिल्हात खेचून आणल्याची माहिती ते देत आहेत. कोविड काळामध्ये अनेक रुग्णांना मदत केली. अन्नधान्य कीट वाटप केले. ऑक्सिजनचा प्लांट उभा केला.रेल्वे कोच कारखाना आणला. तालुक्याला जोडल्याजाणा-या रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी आणलाअसल्याची माहिती त्यांनी दिली. जलजीवन मिशन योजनेसाठी तब्बल साडेचार हजार कोटी रुपयेआणले. प्रधानमंत्री आवास योजनेतूनघरकुल,एमआरईजीएसच्या विहिरी, अपंगांसाठी साहित्य वाटप अशी विविध विकास कामे करण्यात आल्याचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्याकडून या दौऱ्यात सांगण्यात आले. सुधाकर शृंगारे हे ज्या
गावांमध्ये जातील तेथे त्यांचे स्थानिक नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
विधानसभा निवडणुक उदगीर मधून लढविणार असल्याने दिग्गज उमेदवारांचा सहभाग असणार असे दिसत आहे. नेते मंडळींच्या या गाठीभेटींनी जळकोट तालुक्याचे राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. जळकोट मतदार संघात माजी खा. सुधाकर श्रृंगारे यांना दौऱ्या दरम्यान नागरीकाकडून मोठा प्रतिसाद मिळत आसल्याचे दिसत आहे