लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम व उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार राम बोरगावकर यांनी मिटवला एकुरका व चांदेगाव गावचा पाणी प्रश्न
उदगीर तालुक्यातील पाणीटंचाईच्या दृष्टिकोनातून मौजे एकुरका खेरडा कल्लूर येथे पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता भासत होती त्या अनुषंगाने निवडणुक संपताच दुसऱ्या दिवशी तहसीलदार राम बोरगावकर यांनी सर्व लघुपाटबंधारे विभाग गट विकास अधिकारी तलाठी ग्रामसेवक व पाणीपुरवठाशी संबंधित असलेल्या सर्व यंत्रणा विद्युत महावितरण यांची दिनांक 10/05/2024 वार शुक्रवार रोजी बैठक घेऊन पाणीटंचाईवर व उपाय योजना वर तात्काळ करावी करण्याचे आदेश सर्व यंत्रणांना दिले तसेच एकुरका येथे मृत पाणीसाठा होता सदरील गावामध्ये सर्व पाणी स्रोत संपले असून एकुरका साठवून तलावात काही खाजगी व्यक्तीने खड्डे खोदून त्यात पाणबुडी मोटर टाकले होते याची माहिती मिळताच स्वतः जातीने तहसीलदार राम बोरगावकर यांनी गटविकास अधिकारी सुरडकर साहेब संबंधित साठवण तलावाचे शाखा अभियंता तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक यांना सोबत घेऊन सदर तलावर बसविण्यात आलेल्या मोटरी वायर जप्त करून एकुरका गावचा पाणी प्रश्न मिटवला तसेच तिरूम मध्यम प्रकल्प वरील व चांदेगाव येथील साठवण तलावावर काही खाजगी व्यक्तीचे पाणबुडी विद्युत मोटार बसवण्यात आले होते त्याही ठिकाणी भेट देऊन पाणीटंचाईच्या संदर्भाने सर्व आजूबाजूच्या गावातील लोकांना जागृत करून पाण्याचे महत्व पटवून देऊन पाणीटंचाई वर मात करण्यासाठी सर्व खाजगी लोकांनी लावलेल्या मोटारी काढून घेण्याबाबत आव्हान केले प्रसंगी संबंधित गावचे तलाठी मंडळ अधिकारी शाखा अभियंता सरपंच उपसरपंच पोलीस पाटील उपस्थित होते

Popular posts
1920 ऐतिहासिक माणगाव परिषद राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Image
प्रभाग क्र . 20 मधून राजू भोसले यांनी काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज मतदारांमध्ये जोरदार चर्चा
उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू — महायुतीमध्ये उमेदवारीवरून नाराजगी सूर
Image
तोगरी पंचायत समितीसाठी अंकुश ताटपल्ले पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
Image
तिवटग्याळ ग्रामविकासात सरपंच प्रशांत पाटील यांचे उल्लेखनीय योगदान – ‘आदर्श सरपंच’ पुरस्कारासाठी योग्य दावेदार
Image