लोकसभेची निवडणूक ही देशाला घडवणारी : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासाठी जीवन अर्पण केले
उदगीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेजस्वी पुरुष आहेत मागील अनेक वर्षांच्या तपश्चर्याचे फळ आता आपल्या देशाला मिळत असुन मागील १० वर्षात आपल्या देशाचा विकास अतिशय वेगाने झाला. आपल्या भारत देशाचे नाव जगामध्ये प्रसिध्द करणारे ते महान पंतप्रधान आहेत. ही लोकसभेची निवडणूक विकसित भारत करण्याची निवडणूक असुन मोदी सारखे कणखर नेतृत्वाचे हात बळकट करण्यासाठी लातूर लोकसभेचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांना अधिक मताधिक्य देवून विजयी करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करावे. आपल्या देशातील जनतेला आपले कुटुंब समजून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासाठी जीवन अर्पण केले आहे त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे आपली मताची शक्ती उभी करावी असे मत क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते लातूर लोकसभेचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ निडेबन व नळगीर, तोंडार  जिल्हा परिषद सर्कलमधील कार्यकर्तांच्या बुथ मेळाव्याप्रसंगी चांदेगाव पाटी व डोंगरशेळकी येथे बोलत होते. 

याप्रसंगी माजी आ.गोविंदराव केंद्रे,
 माजी आ.सुधाकर भालेराव, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, रामराव बिरादार, रामचंद्र तिरुके, बापुराव राठोड, ज्योती राठोड, पाटील कौळखेडकर, शिवानंद हैबतपुरे, बालाजी भोसले, वसंत पाटील, विजय पाटील, प्रा.श्याम डावळे, बसवराज रोडगे, शिवशंकर धुप्पे, शहाजी पाटील, गणेश गायकवाड, उदयसिंह ठाकुर, उत्तरा कलबुर्गे, 
नरेश सोनवणे, मनोहर भंडे, उदयसिंह मुंडकर, बालाजी देमगुंडे, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी, आपले बुथ प्रमुख हीच आपली ताकद असुन जो बुथ जिंकेल तोच पक्ष विजयी होईल. ही निवडणूक जनतेनी हातात घेतली आहे आणि जनतेनीच 'अबकी बार, चारशो पार' चा नारा दिला आहे. लोकसभेच्या मतदानाला आता ८ दिवस शिल्लक आहेत त्यामुळे आपण सर्वांनी घराघरात जावून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम सांगा. केंद्र शासनाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला पुढे घेवुन जाण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे करत आहेत. या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या मतदार संघाचा आपण झपाट्याने विकास केला असल्याचेही ना.बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी  निडेबन व नळगीर, तोंडार सर्कल मधील विविध गावातील बुथप्रमुख व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.