सरस्वती विद्यालय कुमठा( बु) येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न

अहमदपूर /प्रतिनिधी

सरस्वती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कुमठा बुद्रुक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिनांक 14 -4- 2024 रोजी अतिशय उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे एम.बी उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर जवळे, सुरेश पाटील, विकास मुंडकर, रमेश राजमाने हे व्यासपीठावर विराजमान होते. या प्रसंगी प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी शेख पाच्छाबी, एंचलवाड अश्विनी , एंचलवाड लहू, भोसले प्रसाद यांनी आपले भावपूर्ण मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गडमे अंकिता हिने केले तर आभार प्रदर्शन गडमे निकिता हिने मानले. कार्यक्रमाचा सांगता थोर तू भिमराया या गीताने करण्यात आली.