महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांचा सत्कार
सांगली प्रतिनिधी   दि.9/04/2024  महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. सांगली जिल्ह्यामध्ये  प्रथमिक शिक्षणा विभागामार्फत मॉडेल स्कूल, हॅप्पीनेस प्रोग्रॅम,डिजी ऍप, आधार कार्ड नोंदणी व सरल कामकाज, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर उपक्रमांतर्गत राज्य स्तरीय यश इ.बाबींसोबत राज्य, राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार देऊन जि प सांगली ला गौरविण्यात आले आहे......जिल्हा परिषदेच्या शाळेची भौतिक सुविधा मॉडेल स्कूल, हॅप्पीनेस प्रोग्रॅम,डिजी ऍप, आधार कार्ड नोंदणी व सरल कामकाज, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर उपक्रमांतर्गत राज्य स्तरीय यश इ.बाबींसोबत राज्य, राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार देऊन जि प सांगली ला गौरविण्यात आले आहे......गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली. तसेच विविध उपक्रमाची अंमलबजावणी करून जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी योगदान दिले. तसेच  विविध संवर्गातील पदोन्नती पदावन्नती प्रक्रिया पारदर्शक शिक्षक नियुक्ती शिक्षकांना विविध आर्थिक लाभ देणे शिक्षण सेवक निर्मितीकरण वेतनश्रेणीला मेडिकल बिल इत्यादी देण्यात सांगली जिल्हा परिषद नेहमीच राज्यात अग्रेसर आहे यासाठी साहेब आग्रही राहून चांगले काम करणाऱ्या शिक्षकांच्या नेहमीच पाठीशी राहीले आहेत .सर्व वर्गासाठी स्पर्धा परीक्षा गुणवत्ता शोध आयोजन करणारी सांगली जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्यात एकमेव आहे. गेल्या दोन वर्षात चार वेळा पदोन्नती लाभ देणारे एकमेव जिल्हा परिषद सांगली आहे. त्याची राज्य पातळीवर तसेच आयुक्त शिक्षण सचिव यांनी कौतुक करून प्रशस्तीपत्र दिले. . त्याबद्दल महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांचा " डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांची चळवळ " हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी साहेबांच्या या कामचं सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी ही अभिनंदन केले आहे. तसेच मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षकांच्या प्रश्नांची चर्चा करण्यात आली विशेष करून मागासवर्गीय शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी  "मी नेहमी कटिबद्ध राहीन असे अभिवचन  साहेबांनी बोलताना दिले . या सत्कार  याप्रसंगी  जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी सर व सरचिटणीस विजय कुरणे सर बलभीम घाटे जाधव सर तसेच इतर संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते