उदगीर/ प्रतिनिधी
अखिल भारतीय श्री.स्वामी समर्थ गुरुपीठ श्री.क्षेत्र त्र्यंबकेश्वर द्वारा संचलित श्री.स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा व बाल संस्कार केंद्र रेड्डी कॉलनी हनुमान मंदिर या ठिकाणी साक्षात परब्रम्ह स्वरूप अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मांडनायक,राजाधिराज योगीराज श्री.स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिनाचा कार्यक्रम उत्साहात केंद्रात साजरा करण्यात आला.या प्रकट दिनाच्या सोहळ्याप्रसंगी त्रिकाल आरती, सकाळी 8:00 सकाळी 10:30 व सायंकाळी 10:30 वाजता भाविक -भक्तांचा जनसागर उसळल्याचे चित्र पहावयास मिळाले.आरती कार्यक्रमानंतर सामूहिक श्री. स्वामी चरित्र ग्रंथाचे सामूहिक वाचन करण्यात आले.श्री.स्वामी चरित्र वाचनानंतर मांदियाळी (महाप्रसादाचा) लाभ भाविक भक्तांनी घेतला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष सचिन बामनपल्ले, शुभांगी नादरगे,अशा गव्हाणे,विशाखा गादा,सुनीता हंडरगुळे,माधव मठपती, पांडुरंग गुडमेवार,मयूर फटाटे,पवन बिरादार,निवृत्ती जवळे,विश्वंभर जवळे,माधव सूर्यवंशी,राम करेप्पा,विनायक गादा यांच्यासह समर्थ सेविकाऱ्यांनी परिश्रम घेतले.