उदगीर : तालुक्यातील सुमठाणा, कासराळ, लिंबगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून या भागात तब्बल १२४.२४ हेक्टर तर जळकोट येथे ८८.३१ हेक्टरवर एम.आय.डी.सी करुन माळरानावर उद्योग उभा करुन या परिसरातील शेतक-यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवायची होती म्हणून या भागात शासकीय एमआयडीसी मंजूर करण्यासाठी मी गेल्या ४ वर्षापासून पाठपुरावा करत होतो. आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती व्हावी व मतदारसंघासह परिसरातील बेरोजगार
तरुणांच्या हाताला काम मिळावे या उदात्त हेतूने या भागात एमआयडीसी मंजूर केली. मी स्वत: अनेक बैठका घेतल्या व उद्योगमंत्री उदय सामंत यांना भेटुन विनंती केली होती त्यामुळेच ऊर्जा विभागामार्फत उद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने तत्वत: मान्यता दिली असल्याची माहिती या भागाचे आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
दि.२५ जानेवारी २०२४ रोजी बैठक घेवुन उदगीर एमआयडीसीसाठी जागा अंतीम करण्यात आली असुन सदर प्रस्ताव उच्च स्तरीय समितीकडे पाठविण्यात आला आहे. पुढील आठवड्यात याला मान्यता मिळून कामास गती मिळणार आहे व त्याबरोबरच जळकोट येथे एम आय डी सी साठी जागा एम आय डीसीच्या पथकाने पाहणी केली असल्याचे सांगितले होते. त्याच्या पाठपुराव्यामुळेच आज एम आय डी सी मंजूर झाली आहे.
औद्योगिक वसाहतीसाठी आपण स्वत: आग्रही होतो. आपल्या परिसरातील एम.आय.डी.सी.साठी पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून लेंडी धरणातुन पाणी आरक्षित केले आहे. त्यामुळे आता एम.आय.डी.सी. होणार व या भागातील तरुणांच्या हाताला काम मिळणार असल्याचे मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले आहे.
या औद्योगिक वसाहतीसाठी ( एम.आय.डी.सी.) उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मंजुरी दिल्याबद्दल क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
मतदार संघातील उदगीर व जळकोट येथे एम आय डी सीला मंजुरी मिळाल्याने या भागातील व्यापारी, उद्योगपती व तरूणांनी ना.संजय बनसोडे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.