झकमारली अन् खासदार झालो, राज्यात असतो तर...

उदगीर/प्रतिनिधी
उदगीर मतदारसंघाचा हजोरो कोटींच्या विकासकामाचा आलेख पाहता आज वाटते झकमारी अन् खासदार झालो. राज्यात असतो तर असेच हजारो कोटींची विकास कामे केली असते असे वादग्रस्त विधान करीत प्रधानमंत्री मोदी यांच्या विकासावर एक प्रकारे घणाघात घातला संशय व्यक्त केला. तसेच माता सिता यांच्या सौंदर्यावरही प्रश्न चिन्ह उपस्थित करुन नव्यावादाची थिंगी टाकली आहे
  उदगीर येथील शेल्हाळ येथे मानव सेवा प्रतिष्ठानच्या वतीने राज्य दर्जा सामुहिक खुल्या वारकरी सांप्रदायिक भजन कूट-२०२४ कार्यक्रम  खासदार सुधाकर श्रृंगारे बोलत होते.
उद्धाटक ह.भ.प. प्रशांत महाराज खानापुरकर तसेच ना. संजय बनसोडे हे होते तर  प्रमुख उपस्थिती म्हणून पंडित कल्याण गायकवाड,  माजी जि.प. सभापती बापूराव राठोड, सरपंच विमलबाई चिखले, शेल्हाळचे सुपुत्र डाॅ.अनिल कांबळे, तोंडचिरचे सरपंच सुदर्शन पाटील, तहसीलदार विकास बिरादार, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर धुप्पे, संचालक भगवानराव पाटील तळेगावकर,सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश लांडगे, किरण लांडगे, उमाकांत तपशाळे, प्रा.श्याम डावळे, मराठा सेवा संघाचे विवेक सुकणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता सायस दराडे, सरपंच उदय मुंडकर, भिम लांडगे, वसंत पाटील,  छावाचे दत्ता पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. श्रृंगारे म्हणाले, मी खासदार झाला पण हजारो कोटी निधी अनु शकलो नाही. ना संजय बनसोडे यांच्या विकासाचा हजारो कोटीचा आलेख पाहिला तर वाट झकमाली अन् खासदार झालो. आम्हाला इतका निधी आनलो नाही म्हणत मोदींच्या विकास कामावरच प्रश्न चिन्ह उपस्थित केला. शिवाय रावणाची पत्नी सुंदर असतांनाही माता सिता सुंदर नसतांनाही रावणाने पळवू नेले म्हणत सितेच्या सौंदर्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करुन नावा वाद निर्माण केला आहे.
एकंदरीत खासदार श्रृंगारे यांच्या वादग्रस्त विधानानंतर पुन्हा त्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित राहत आहे. त्यांच्या आजवरच्या विधानाकडे पाहिले तर पक्षत्यांना पुन्हा संधी देणार का याकडे लातूर लोकसभा मतदार संघातील जनतेचे लक्ष लागले आहे.