लातूर लोकसभेचे निवडणूक प्रमुख राहुल केंद्रे यांनी केला रावणगाव येथे मुक्काम (गाव चलो अभियान)

भारतीय जनता पार्टी चे लातूर लोकसभेचे निवडणूक प्रमुख राहुल केंद्रे यांनी रावणगाव येथे गाव चलो अभियाना निमित्य मौजे रावणगाव येथे मुक्काम केला सध्या देशभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरातील सर्व ग्रामीण भागामध्ये गाव चलो अभियान ही मोहीम राबवण्यात येत असून याचा भाग म्हणून श्री राहुल केंद्रे यांनी उदगीर तालुक्यातील रावणगाव येथे कल्लेश्वर पाटील यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांसह स्नेहभोजन घेऊन या ठिकाणी मुक्काम केला भारतीय जनता पार्टी नेहमीच सामान्य जनता व पक्षाचा पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याचे काम विविध अभियानाच्या माध्यमातून करत असते गाव चलो अभियानाच्या निमित्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दहा वर्षांमध्ये केलेले विकास कामे वैयक्तिक लाभाच्या योजना भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक रचना त्यात बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख सुपर वॉरियर अशी रचना केली असून या सर्व गोष्टींचा लेखाजोखा या अभियानातून श्री राहुल केंद्रे यांनी घेतला दांडगा जनसंपर्क संघटन कौशल्य म्हणून यांच्याकडे पाहिले जाते ते राहुल केंद्रे रावणगाव येथे एक दिवस मुक्कामासाठी येणार याची उत्सुकता गावकर यांना लागली होती ते गावात आल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. बुथ बैठकीचे रूपांतर बूथ संमेलनात झाले मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते यावेळी या अभियानाच्या निमित्ताने जनतेसोबत संवाद साधताना राहुल केंद्रे म्हणाले आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सर्वसामान्य कुटुंबातील अगदी चहा विकणारा माणूस देशाचा प्रधानमंत्री होऊ शकला आज संपूर्ण जगामध्ये नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून भारताचे नावलौकिक होत असून आज जगाने मान्य केले आहे की नरेंद्र मोदी हे एकट्या भारताचे प्रमुख नसून संपूर्ण जगाचे प्रमुख नेते म्हणून त्यांची ख्याती निर्माण झाली आहे आज आपण पाहतोय मोदी सरकारने प्रत्येक क्षेत्रामध्ये विकासाची एक वेगळी उंची गाठली आहे घरकुल असेल स्वच्छालय असेल गॅस असेल मोफत राशन असेल जीवनदायी योजना शेतकरी सन्मान योजना असेल स्टार्ट अप इंडिया मेक इन इंडिया देशाची लॉयन ऑर्डर असेल या विषयावरती सरकारने प्रचंड असे काम केले असून त्याचाच परिपाक म्हणून बऱ्याचश्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार परत परत येत आहे देशांमध्ये सुद्धा एक दशकापासून मोदीजी चे नेतृत्व जनता मान्य करत असून 2024 या निवडणुकीमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी विजयाची हॅट्रिक करणार व भारताला जगाची महासत्ता नरेंद्र मोदी करणार असे चित्र देशात निर्माण झाले आहे देशभरातील करोडो लोकांचे स्वप्न होते प्रभू रामचंद्राचे मंदिर निर्माण झाले पाहिजे नरेंद्र मोदींनी जनतेचे हे स्वप्न खऱ्यामध्ये उतरण्याचं काम केलं आहे यावेळी अनुसूचित मोर्चाचे प्रदेश सचिव बालाजीराव गवारे प्रदीप जाधव विश्वनाथराव डोंगानपुरे सर यांचेही मनोगत पार पडले हे संमेलन पार पडल्यानंतर राहुल केंद्रे यांनी गावातील लाभार्थ्यांची चर्चा केली काही लोकांच्या अडचणी समजून घेतल्या उपस्थित नागरिकांसोबत अल्पोपहारही केला त्यानंतर ते कलेश्वर पाटील यांच्या निवासस्थानी बुध च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी स्नेहभोजन घेतले व पाटील यांच्या निवासस्थानी मुक्काम केला दुसऱ्या दिवशी ते सकाळी सहा वाजता आदर्श शेतकरी भीमरावांना डोंगा पुरे यांच्या शेतावरती जाऊन आधुनिक शेतीची व विविध फळबागांची त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत पाहणी केली त्यानंतर विविध समाजातील परिवारांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेटी दिल्या 2024 च्या महाविद्यांमध्ये आपण परत एकदा नरेंद्रजी मोदी यांना प्रधानमंत्री करण्यासंदर्भात विनंती केली जिल्हा परिषद शाळा धार्मिक स्थळे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी केंद्रे यांनी भेटी दिल्या त्यानंतर गावातील प्रत्येक गल्लीमध्ये नरेंद्र मोदीच्या दहा वर्षातील कार्याचे पत्रक हीतेने वाटप केले यावेळी त्यांच्या समवेत अनुसूचित मोर्चाचे प्रदेश सचिव बालाजीराव गवारे जिल्हा उपाध्यक्ष संजय काका पाटील युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर बिरादार प्रदीप जाधव भीमरावांना डोणगापुरे कल्लेश्वर पाटील जहांगीर पटेल विश्वनाथराव डोंगापुरे रमेश बिरादार वामनराव पाटील गोरख मेहत्रे डॉक्टर शिवा पाटील कैलास कापसे शिवा बिरादार महेश पाटील उपस्थित होते