उदगीर येथील देगलूर रोड सर्वे नंबर 238 / 244 हाडोळा जमीनीवर केलेले आतिक्रमणा वर कार्यवाही करा तहसिलदार यांना निवेदन
उदगीर / प्रतिनिधी
उदगीर येथे देगलूर रोड या ठीकानी वतनदार म्हणून उदगीर येथे सर्वे नंबर 238 / 244 मधील
देगलूर रोड लगत असलेली 18 गुंठे शेतजमीन श्री दिलीप केरबा तोगरीकर रा. तोगरी, तालुका
उदगीर यांनी बेकायदेशी रीत्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. 18 गुंठे जमीन क्षेत्रावर  दिलीप तोगरीकर यांनी त्यांच्या नावाची पाटी लावून  जमिनीचा उपभोग घेत आहेत जे की
बेकायदेशीर व नियमबाह्य आहे. यांचा महार हाडोळा शी काही संबंध नसतान मा. अप्पर आयुक्त छत्रपती.संभाजीनगर यांनी दि.23.03.2022 प्र.क्र.ROR/इनाम/डेस्क/2018 या
प्रकरणात आदेश केल्याप्रमाणे सर्वे नंबर 238 व 244 हे जमीन क्षेत्र “समस्त महार” अशी नोंद
७/१२ उताऱ्या वरती घेण्यात आलेली आहे.म्हणून सर्वे नंबर 244 मधे आजपर्यंत कोणाची ही मालकी हक्क सिध्द होऊ शकले नाही.  सर्वे नंबर 238 व 244 जमीन क्षेत्र समस्त महार नावे असल्याने मे. साहेबांनी श्री दिलीप तोगरीकर यांनी केलेल्या अतिक्रमणावर लवकरात लवकर नियमानुसार
कारवाई करावे आसे शिवाजी  सोनकांबळे व विनोद वाहुळे यांनी निवेदन तहसिदार  यांना  दिले आहे