स्व.खाशाबा जाधव यांच्या नावाने महादंगल आयोजीत करणार : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
आडत वेलफेअर असोसिएशनच्या वतीने प्रतिर्षी जंगी कुस्त्यांचे आयोजन
उदगीर : राज्यातील युवकांचा खेळासह, सांस्कृतिक आणि इतर सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शासन कटिबद्ध असून त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत. उदगीर शहरात श्री गुरु हावगीस्वामी यात्रा महोत्सवानिमित्त आयोजीत भव्य कुस्ती स्पर्धा होते याचा मला मनस्वी आनंद आहे. भविष्यात उदगीर येथील याच तालुका क्रीडा संकुलावर स्व.खाशाबा जाधव यांच्या नावाने महादंगल आयोजीत करणार असल्याचे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर येथील तालुका क्रीडा संकुलावर आयोजित कुस्ती स्पर्धेच्यावेळी बोलत होते.

यावेळी व्यास पीठावर बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, संचालक श्याम डावळे,  वसंत पाटील, माजी नगराध्यक्षा
सौ.उषाताई कांबळे, माजी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, शहराध्यक्ष समीर शेख, उद्योजक सागर महाजन, नागेश आंबेगवागे, कुणाल बागबंदे, गौतम पिंपरे, मारोती कडेवार, राजेश अंबरखाने,  आडत वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधर बिरादार आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, आपल्या भागात खेळाची संस्कृती रुजवायची असुन उदगीर शहरात मागील काळात विविध स्पर्धा संपन्न झाल्या असुन लवकरच येथील तालुका क्रीडा संकुलावर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचेही ना.बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी पंचक्रोशीतील मल्ल व कुस्तीप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.