दिव्यांगानाचे 5 टक्के निधी दया गटविकास अधिकारी यांच्याकडे मागनी

 

देवणी ग्रामीण भागातले अनेक दिव्यांग विक्त आयोगाच्या पाच टक्के निधी पासुन वंचित राहत आहेत .तसेच या दिव्यांगाना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही.  तसेच त्यांना राहण्यासाठी स्वतःची जागा नसून ते बेघर व बेसहारा आहेत दिव्यांगाना त्याचा हक्क मिळून देण्यासाठी  महाराष्ट्र अपंग कामगार कल्याणकारी  संगठना सातत्याने कार्य करत आहेत. तसेच शहरातील व ग्रामीण भागातील अनेक गोर गरीब प्रधान मंत्री आवास योजनेच्या थकीत बिला पासून वंचित राहत आहेत. थकीत असलेले बिल पात्र घरकुल लाभार्थ्याच्या खात्यात  तात्काळ बिल जमा करण्यात यावे यासाठी महाराष्ट अपंग कामगार कल्याणकारी संघ शाखा देवणी च्या वतीने माननीय गटविकास अधिकारी  साहेब  पंचायतसमिती देवणी यांच्या कार्यलयात दिनांक 30/7/2021 रोजी निवेदन पत्र देण्यात आले आहे. तसेच दिव्यांगाच्या हक्काची पाच टक्के निधी तात्काळ मिळवून देण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. अन्यथा  महाराष्ट्र  अपंग कामगार कल्याणकारी संघ शाखा देवणी च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यास भाग पडेल याची शासन दरबारी नोंद घेण्यात यावी अशी विनंती  या संघटनेचे तालुका अध्यक्ष मा. श्री निळकंठ डोंगरे यांनी केले आहेत.                      प्रकाश कांबळे कृष्णा पिंजरे  कविता जाधव शेख गौसरवी डोंगरे व आदिची उपस्थीती होती